नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन झाल्याच्या प्रसंगाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या घटनेमुळे आता काश्मीर राष्ट्रीय मालवाहतूक जाळ्याशी जोडले गेले असून, हे एक महत्त्वाचे यश ठरले आहे.
याविषयी केंद्रीय रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर प्रसारित केलेल्या संदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला. या घडामोडीमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रगती आणि समृद्धी दोन्ही वाढीला लागेल असे त्यांनी म्हटले आहे.
संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेली प्रतिक्रिया :”जम्मू आणि काश्मीरमधील व्यापार आणि दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा दिवस ! यामुळे प्रगती आणि समृद्धी दोन्ही वाढीला लागेल.”