इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असं म्हणतात की, प्रेमाच्या बाबतीत शहाणा आणि व्यवहारी विचार करणारा माणूसही अनेकदा लहान मुलांसारखं वागू लागतो. कधीकधी प्रेम गमावण्याच्या भीतीने लोक घाबरून खोटे बोलतात. विशेषतः लोक पहिल्या डेटबद्दल खूप घाबरतात. काही लोक पहिली डेट यशस्वी करण्यासाठी उघडपणे खोटे बोलतात. याला ‘सफेद खोटे’ बोलणे चुकीचे ठरणार नाही. प्रेमाच्या सुरुवातीलाच खोटं बोलून चूक केलीय हे त्यांना माहित आहे पण तरीही ते खोटं बोलतात. विशेषतः मुले या बाबतीत खूप पुढे आहेत. चला, जाणून घेऊया कोणत्या केसेसमध्ये मुलं खोटं बोलतात-
कुल असल्याचे दाखवणे:- जी मुले छोट्या छोट्या गोष्टींवरही रागाने प्रतिक्रिया देतात, ते पहिल्या डेटला, त्यांना कशाचीही परवा नाही असे दाखवतात. स्वतः अगदी कुल असलायचं खोटे काही मुलं नेहमी बोलत असतात.
जॉब प्रोफाईल- जॉब प्रोफाईलबद्दल मुले अनेकदा खोटे बोलतात. आपले काम मोठे असल्याचे सांगून , त्याला मुलीवर आपली पहिली छाप पाडायची असते. ज्यामुळे तो कनिष्ठ स्तरावर असल्याची वस्तुस्थिती लपवत असतो.
फिटनेस फ्रीक:- मुलांना वाटते की जगातील सर्व मुलींना जिममध्ये जाणारे मुले आवडतात. अशा परिस्थितीत, पहिल्या डेटला, मुले आकारात नसतानाही, व्यायाम चुकवणे, व्यस्थ असणे अशी कारणे देऊन ते त्यांच्याफिटनेसबद्दल खोटे बोलतात.
मैनेजएबल:– अनेक मुलं विविध मार्गांनी स्वतःला असे सादर करतात की ते प्रत्येक लहान गोष्टी अतिशय चांगल्या रित्या मैनेज करता. अर्थात, त्यांना चहा कसा बनवायचा हे देखील माहित नाही, परंतु ते प्रत्येक कामात स्वतःला परिपूर्ण असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात.
घर:- मुलं घराबद्दल सुद्धा खोटं बोलतात. घराशी संबंधित अनेक गोष्टी एकतर पूर्णपणे सांगितले जात नाहीत किंवा त्याबद्दल अनेक प्रकारचे खोटे बोलले जातात, जेणेकरून भविष्यात लग्नाची चर्चा झाली तर मुलीला असे काही वाटू नये आणि ती त्याच्या चांगल्या घरात जाण्याचा विचार करू शकते.