अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पावसाचा जोर कमी झाल्याने दोन –तीन दिवसां पासून गिरणा नदीला पाणी कमी झालेले असल्याने काल रात्री दोनच्या सुमारास दादा बुधा मोरे हा वयोवृध्द गिरणा नदीच्या मधील खडकांवर बसून मासेमारी करीत असतांना नदीला अचानक पूर आला. मात्र ही बाब मोरे याच्या लक्षात न आल्याने तो पाण्यात वेढला गेला आणि वाहून जात असतांना दगडांच्या आश्रयाला अडकला. सकाळी ही गोष्ट महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाला समजल्यावर पथकातील पट्टीचा पोहणारा जवान शकील तैराक याने पाण्याच्या जोरदार वाहणा-या प्रवाहात जात बुधा मोरे यांना लाईफ जाकेट घालत त्याला काठावर सुखरुप पणे बाहेर आणले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. आज पर्यंत शकिल याने अनेकांना पाण्यातून वाचविण्यात यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले.