नाशिक – पोलिसांची परवानगी नसताना आणि कोरोनाचे निर्बंध सुरू असतानाही बिनदिक्कतपणे मेळावा आयोजित करणाऱ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. “नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा मेगा मेळावा” हे वृत्त सर्वप्रथम इंडिया दर्पणने काल प्रसिद्ध केले होते. त्याची तत्काळ दखल नाशिक पोलिसांनी घेतली आहे. विनापरवानगी आणि कोविड काळातही तब्बल १२०० ते १५०० जणांचा जमाव जमविल्या प्रकरणी मेळावा आयोजकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचीच एक शाखा असलेली युवा सेनाही सक्रीय झाली आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा स्थितीतही युवा सेनेने खुटवड नगर येथील श्री सिद्धी बँक्वेट हॉल येथे जंगी मेळावा घेतला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. असे असतानाही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल १२०० ते १५०० कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामुळे खुटवडनगरमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. याचे सर्वप्रथम वृत्त इंडिया दर्पणने व्हिडिओसह प्रसिद्ध केले. त्याची दखल अंबड पोलिसांनी घेतली आहे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर, बाळकृष्ण शिरसाठ, गणेश बर्वे, रुपेश पालकर यांच्या विरुद्ध आपत्ती व्वस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेळाव्यात मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमासह अन्य कोरोना नियमांचे बिनदिक्कत उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिस अधिक तपास करीत असून