केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सिडकोत अश्लील भाषेत फलक; गुन्हा दाखल
नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विषयी अश्लील भाषेत फलक लावल्यावरुन मारुती भाऊराव फड (वय ५६, वंदे मातरम चौक, शिवाजी चौक) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सत्यम सुरेश शिंदे (वय ४३, साई पुजा अपार्टमेंट मंगलमूर्तीनगर जेल रोड) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता.२५) दुपारी अडीचच्या सुमारास सिडकोतील शिवाजी चौकात चहा दुकानापुढे केंद्रीय मंत्र्याच्या फोटोखाली अतिशय अश्लील भाषेतील मजकूर लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक
नाशिक – नाशिक रोडला देवी चौकात घातक शस्त्र घेउन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बासी उर्फ शुभम हरबीर बहेनवाल (वय २२, फर्नाडींसवाडी जय भवानी रोड ) असे संशयिताचे नाव आहे. बुधवारी (ता.२५) सायंकाळी पावने पाचच्या सुमारास त्याला दोवी चौकात दोन धारदार कोयते घेउन फिरतांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी
पोलिस शिपाई सागर चंद्रभान आडने (वय ३४) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पंचकला आयोध्यानगरीत घरफोडी
नाशिक – पंचक शिवारात आयोध्यानगर परिसरातील मदलसा सोसायटीत घरफोडीत सोन्या चांदीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० ते २५ तारखेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. प्रियंका प्रवीण यादव (वय २५, आयोघ्यानगर, पंचक) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माती अशी प्रियंका यादव २० तारखेला बाहेरगावी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयडा तोडून घरातील २ ग्रॅमचे सोन्याचे रिंग,३०० मिली ग्रॅमचे सोन्याचे ओम पान, २१ ग्रॅमच्या लहान मुलाच्या चांदीच्या पट्या, एयरटेल कंपनीचा मोबाईल, खंडोबा मंदीरातील ९६ ग्रॅमचा आणि १५ ग्रॅमचा चांदीचा मुकुट, असा सुमारे ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.