शिवसेना शाखेचे उदघाटन पडले महागात; गर्दी जमविल्यामुळे आठ पदाधिका-यांवर गुन्हा दाखल
नाशिक – पाथर्डी फाटा परिसरात शिवसेना महिला आघाडीची शाखा उघडण्याच्या निमित्ताने गर्दी जमविल्याप्रकरणी शिवसेनेच्या ८ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटक करुणा धामणे, ऐश्वर्या भदाणे, सुशीला राजपूत, ललिता गोसावी, गायत्री सुर्यवंशी, रोहीनी जाधव, उज्वला जोशी, दीपाली पाटील आदीसह चाळीस ते पन्नास महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (ता.२१) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात शिवसेना महिला आघाडी शाखेच्या उध्दाटनाचा कार्यक्रम होता यात विनापरवानगी गर्दी जमविल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीच्या संशयावरुन एकाला अटक
नाशिक – पंचवटीत तिडकेनगर पंपीग स्टेशनच्या इमारतीच्या कंपाउडजवळ मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास संशयास्पद फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. गौरव प्रकाश जाधव (वय २०, वस्तुरंग अपार्टमेंट, आरटीओ जवळ पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. काल शनिवारी (ता.२१) मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास हा इमारतीच्या कंपाउंडच्या भितींजवळ संशयास्पद रित्या फिरत असतांना गस्तीवरील पंचवटी पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.