इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बनावट कंपन्यांद्वारे महाराष्ट्रातल्या तब्बल ११ जिल्ह्यात गोळ्या-औषधांचं पुरवठा झाल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सूरत आणि ठाणे या दोन ठिकाणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या बनावट कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात औषध पुरवठा झाला त्यात म्रिस्टल फॉम्र्युलेशन (उत्तराखंड), रिफंट फार्मा (केरळ), कॉम्युलेशन (आंध्र प्रदेश) मेलवॉन बायोसायन्सेस (केरळ) एसएमएन लॅब (उत्तराखंड) या कंपन्यांचा समावेश आहे.
या घटनेची सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्राच्या औषध विभागाने संबंधित राज्यांच्या वैद्यकीय यंत्रणांशी संपर्क केला. त्यात मिळालेल्या उत्तरात संबंधित पत्त्यावर अशा कोणत्याही कंपन्याच नसल्याचं समोर आले आहे. धाराशीवला म्रिस्टल कंपनीचा औषधसाठा मिळाला होता तो परभणी, रायगड, रत्नागिरी, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, सिंधुदुर्ग, अमरावती, ठाणे आणि हिंगोली या जिल्ह्यांकडून पाठवला गेल्याची माहिती समोर आली आहे.
या गैरप्रकारात मिहीर त्रिवेदी आणि द्विती त्रिवेदी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. त्यानंतर ही चौकशी बीड, भिवंडी, मिरा रोड, सूरत व उत्तराखंडयेथे करण्यात आली. उत्तराखंड सरकारच्या यंत्रणेला विचारणा झाली त्यावेळेस त्या राज्यात औषध पुरवठा करणारी कंपनीच अस्तित्वात नसल्याचं समोर आले. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य वाढले. त्यानंतर चौकशीत अनेक बाबी आता उघड झाल्या. दरम्यान या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली असून माजी आरोग्यमंत्र तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.