भाजपच्या पदाधिका-यांवर गुन्हे
नाशिक : साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना शासनाविरोधात आक्रोश आंदोलन करणा-या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तीन महिला पदाधिकारींचा समावेश आहे. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महिला आघाडीच्या स्वाती भामरे, माधुरी पालवे, रोहिणी नायडू यांच्यासह इतर पदाधिका-यांचा यात सामावेश आहे. ३ जुन रोजी आघाडी शासन न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करीत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अक्रोश आंदोलन केले. यासाठी त्यांनी पोलीसांकडे मागितलेली परवानगी नाकारण्यात आली असतानाही हे आदोंलन केल्याने या पदाधिका-यांवर पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक मच्छींद्र कोल्हे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.
…..