नाशिक – धुलीवंदनला दाजीबा मिरवणुकीत तलवारींचा नाच व मिरवणूक जागेवर न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाजीबा मिरवणूक एकाच ठिकाणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याचे उल्लंघन झाल्याने आयोजक विनोद हिरामण बेलगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.तर पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरवणुकीत तलवारी तसेच कोयत्याचा वापर केल्याने भारतीय कायदा व मुंबई पोलीस कायदा अन्वये यश राजेंद्र जाधव, अमित प्रजापती, रोहित चौरासिया आणि तुषार पहाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाजीबा मिरवणुकीची नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी काढण्याची अनोखी परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे ही मिरवणूक निघाली नव्हती. मात्र दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा ही मिरवणूक काढण्यात आली. पण, त्यात कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.