नाशिक – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बनावट नियुक्तीपत्र तयार करुन गंडा घालणा-या विरुध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक करण्याचा हा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी बाबासाहेब निवृत्ती भूतकर (वय ५१, अक्षय बेहळे, तपोवन रोड) यांनी तक्रार केली आहे. औरंगाबादचे रविंद्र जाधव असे संशयिताचे नाव आहे. जाधव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात बनावट नियुक्तीपत्र तयार करुन उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.