नाशिक, – जिल्हापरिषदेतील रोखपालाने लघु पाटबंधारे विभागातील ठेकेदाराची २२ लाखांची अनामत रकमा परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहाय्यक जलसंधारण अधिकारी रघुनाथ गवळी यानी तक्रार दाखल दिली असून भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र बाबूलाल ठाकरे (कनिष्ठ सहाय्यक लिपीक जिल्हा परिषद नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपीक असलेल्या या सशयिताने लघु पाटबंधारे सहाय्यक जलसंधारण आधिकाऱ्याच्या बॅक खात्यातील ठेकेदारांच्या सुमारे २२ लाख २१ हजार ५०० रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.