नाशिकः कोरोना निर्बंध सुरू असतानाही एकत्र जमून आंदोलन केल्याप्रकरी कॉग्रेसच्या पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार हिरामण खोसकर, कॉगेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, हनिफ बसीर, प्रवक्ता हेमलता पाटील, महिला आघाडीच्या शोभा बच्छाव, सुरेश मारू, राजेंद्र बागुल, रौफ कोकणी, रमेश पवार, बबलु खैरे, दर्शन पाटील, भारती गीते, राजेंद्र ठाकरे, स्वप्नील पाटील, ज्ञोनेश्वर काळे यांच्यासह इतर २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी महात्मा गांधी रोड येथील कॉग्रेसच्या कार्यालयासमोर काळे झेंडे, काळ्या फित लावून निदर्शने तसेच धरणे आंदोलन केले. साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असताना त्यांनी याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक कोल्हे करत आहेत.