नाशिक –कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरात विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल भाजपच्या नगरसेविका प्रीतम आढाव यांच्यासह
वीस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक पंढरीनाथ सोपान आहेर यांच्या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी – नगरसेविका प्रीतम आढाव यांच्या नेतृत्वाखाली दक्षता आढाव, रिना आढाव, सोनी आढाव, प्रियंका बोथे, निकिता आगळे, विक्रम विलास चौधरी, निखील सातपुते, सागर खंडू धोंगडे, नीलेश हेंबाडे, ताराचंद लहांगे, स्वप्नील गवळी, सिध्देश कटारे, दीपक बागूल, निलेश कांडेकर, विजय गायकवाड, सचिन हांडगे, महेंद्र जाधव, महेश सरोदे, रोहीत पाईकराव आदीसह नव्वद ते शंभर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. देवळाली कॅम्प ते इंद्रायणी सोसायटी या दरम्यान वडनेर रोडवर या सगळ्यांनी गुरुवारी (ता.९) साडे बाराच्या सुमारास कोरोना प्रतिबंधाचे नियम डावलून मिरवणूक काढली.यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.