गोंगाटाबद्दल हटकल्याने लाठ्या काठ्यांनी मारहाण
नाशिक – घरात हद्यरोगाचे पेशंट असून घरासमोर गोंगाट करणाऱ्यांना तरुणांना हटकल्याने तिघांनी एकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. उस्मान, रिझवान, हाफीन तस्मीन (पूर्ण नाव नाही), अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात राफे राशीद फारुखी (वय १९, मूळ वफा कॉम्प्लेक्स, अमृतनगर, मुंब्रा, सध्या आझमी, व्होक्हार्ट हॉस्टीटल जवळ, आझादनगर, द्वारका) याच्या तक्रारीवरुन तिघा संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.६) दुपारी साडे तीनला द्वारका परिसरातील व्होक्हार्ट हॉस्पीटल समोरील आझमी बंगल्यासमोर काही तरुण मोठमोठ्याने आवाज करीत असल्याने तक्रारदार राफी याने संबधितांना घरात हदय रोगाचा पेशंट असल्याने त्यांना आवाजाचा त्रास होत असल्याने गोंगाट करण्यास मनाई केली. त्याने चिडून तिघा संशयितांनी वाद घालत शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण करीत तक्रारदाराला जखमी केले.
शहरात दोन दुचाकीची चोरी
नाशिक – द्वारका परिसरात साहील लॉन्सच्या पाठीमागील भक्तीनगर अर्पाटमेंट मधून चोरट्याने दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी साजिद रज्जाक सय्यद (वय ४३, भक्तीनगर, साहिल लॉन्समागे) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात वाहन चोरीला गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार साजिद रज्जाक यांनी त्यांची हिरो होंडा पॅशन प्लस (एमएच ०५ एएन ८०२) दुचाकी त्यांच्या राहत्या भक्तीनगर अपार्टमेंटच्या पार्किंमध्ये पार्क केली असता, चोरट्याने घराच्या पार्किंगमधून दुचाकी चोरुन नेली. दुसऱ्या घटनेत नाशिक रोडला टिळक पथ परिसरातील कावळे कंपाउंटमधील दुचाकी चोरली. याप्रकरणी प्रमोद अरुण नाईकवाडे (वय ३०, लक्ष्मी नारायण मंदीर भगूर) यांच्या तक्रारीवरुन शिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार प्रमोद यांची बजाज पल्सर दुचाकी (एम एच १५ डीआर ४४७६) ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.