दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यु
नाशिक : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील ट्रक टर्मिनल भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सारिका दीपक जोशी (४१ रा.गौरव प्लाझा,इंदिरानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. जोशी रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास पतीसमवेत दुचाकीवर ओझरच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. आडगाव येथील ट्रक टर्मिनल भागात दुचाकीचा अपघात झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पती दीपक जोशी यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
.
घरी गळफास लावून एकाची आत्महत्या
नाशिक : भगूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र प्रल्हाद बोरसे (रा.खंडेराव मंदिर,जुने बस स्टॉप मागे भगूर) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. बोरसे यांनी रविवारी (दि.२९) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. राजेंद्र बोरसे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.