इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात तरुण पंतप्रधान अशी ओळख असलेल्या फिनलंडच्या सना मरिन पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ लीक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. व्हिडिओमध्ये सना या दारू पिऊन मैत्रिणींसोबत डान्स करत आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी या व्हिडिओच्या आधारे केला आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, सना मरिन यांनी कबूल केले आहे की, त्या मित्रांसोबत मद्यपान करत होत्या परंतु, ड्रग्ज घेण्याच्या अफवा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आपल्या मित्रांसोबत मद्यपान करताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लोक पंतप्रधानांच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण या घटनेला सामान्य म्हणत आहेत तर काहींनी सना मरीन फिनलंडच्या पंतप्रधानपदासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
फिनलंडच्या स्पोर्ट्स टॉक शोचे होस्ट अॅलेक्सी वल्लावुरी यांनी त्यांना देशातील सर्वात असक्षम पंतप्रधान म्हटले आहे. कृपया तुमचे लेदर जॅकेट घ्या आणि राजीनामा द्या, असे ट्विट त्यांनी केले आहे. फिनलंडच्या प्रतिष्ठित वृत्तपत्रानुसार, व्हिडिओमध्ये मरीनला मित्रांसोबत नाचताना आणि फिनिश रॅपर पेट्री नायगार्ड आणि पॉप गायक अँटी तुइस्कू यांच्या गाण्यांवर गाताना दिसत आहेत. त्या प्रथम इंस्टाग्राम स्टोरीजवर अपलोड करण्यात आल्या होत्या.
त्यांनी ज्या पार्टीला हजेरी लावली त्यात ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पंतप्रधान सना मरिन यांनी सांगितले की, आवश्यक असल्यास त्या औषध चाचणीसाठी तयार आहेत. “माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही. मी कधीही ड्रग्ज घेतलेले नाही,” तर, विरोधी फिन्स पक्षाचे अध्यक्ष रिक्का पुरा यांनी हेलसिंगिन सनोमत यांच्या मुलाखतीदरम्यान स्वेच्छेने औषध चाचणी घेण्याचे आवाहन केल्यानंतर मरीन यांनी केले आहे.
बघा त्यांच्या पार्टीचा हा व्हिडिओ
https://twitter.com/khalediskef/status/1560246695602036736?s=20&t=XjtTlavEj1Sp0nax3EXjSQ
Finland PM Sana Marin Party Video Viral
Drugs Opposition Demand Resignation