वॉशिंग्टन – कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात अमेरिकेने पुन्हा एकदा चीनवर दबाव वाढवला आहे. कोरोना विषाणू विषयी व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, जगाला कोरोना साथीच्या मूळ स्थानाचा शोध घेण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात निश्चित स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असून हा शोध चीन देशापर्यंत जाऊ शकतो.
व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार अँडी स्लाविट यांनी सांगितले की, या साथीच्या मुळाशी जावे लागेल आणि त्यासाठी चीनला पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया स्वीकारावी लागेल. यासंदर्भात डब्ल्यूएचओने मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आत्ता हे घडत नाही, त्यामुळे परिणाम काहीही असो, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोगाचा मूळ शोधणे होय.
अँडी स्लाविट पुढे म्हणाले, अमेरिकन वृत्तपत्र वॉलस्ट्रीट जर्नलच्या अहवालाच्या म्हटले गेले आहे की, नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान लॅबचे संशोधक आजारी पडले होते, चीनमध्ये कोरोना साथीच्या पहिल्या घटनेची नोंद झाली त्याच्या एक महिन्यापूर्वी आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या अहवालानुसार सदर संशोधकांमध्ये कोरोनासारखे लक्षण होते. या अहवालानंतर पुन्हा एकदा चिनी लॅबमधून सोडल्या गेलेल्या कोरोना विषाणूच्या आरोपाला पुन्हा जोर आला.
तथापि, या वर्षाच्या सुरुवातीस चीनमध्ये दाखल झालेल्या डब्ल्यूएचओ संघाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, लॅबमधून व्हायरस बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. परंतु चीननेही डब्ल्यूएच टीमला कच्चा डेटा देण्यास नकार दिला. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय चौकशीला उशीर केल्याचा आरोप चीनवर आहे. एवढेच नव्हे तर चीनने प्रयोगशाळेची स्वच्छता अशा प्रकारे केली की सर्व पुरावे मिटू शकतील, असा आरोपही केला जात आहे.