मुंबई – व्हाट्सअँप अतिशय लोकप्रिय आहे. परंतु आहे त्या लोकप्रियतेवर समाधानी न होता व्हाट्सअँप अधिकाधिक सोयी वापरकर्त्यांना देण्याचा प्रयत्न करते. काही दिवसातच या सेवेचा वापर करून तुम्ही घराजवळच्या किराणा दुकान, हॉटेल याचा शोध घेऊ शकता. ही सोया साओ पावलोमधील ग्राहकांसाठी सुरु करण्यात आली आहे. लवकरच ती जगभर उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. व्हॉट्सअॅप ट्रॅकर, WABetaInfo ने ही माहिती दिली असून ही सोय iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अॅपमधून बाहेर न पडत हॉटेल, भोजनालय, किराणा किंवा कपड्यांची दुकाने इत्यादी शोधणे सहज शक्य होईल.
व्हाट्सअँपमध्ये सर्च केल्यावर त्यात , तेव्हा “बिझनेस निअरबाय” नावाचा एक नवीन विभाग दिसेल. जेव्हा तुम्ही हॉटेल, भोजनालय, किराणा किंवा कपड्यांची दुकाने वगैरे निवडाल, तेव्हा तुमच्या आवडीनुसार हे व्यवसाय कुठे आहेत ते दिसेल. जे लोक आधीच व्हाट्सअँपची ‘बिझनेस डिरेक्टरी’ वापरतात त्यांच्यासाठी ही सोय उपलब्ध होईल. भविष्यातील अपडेटमध्ये ते उपलब्ध होईल. iOS 2.21.170.12 अपडेटसाठी व्हाट्सअँप बीटा version आल्यानंतर, व्हाट्सअँप नव्याने डिझाइन केलेले ‘बिझनेस डिरेक्टरी’चे पेज दिसेल.
कालांतराने व्हाट्सअँप तुमच्या कॉन्टॅक्ट इन्फोमध्येच ही सोय करून देईल. या कॉन्टॅक्ट इन्फोचा इंटरफेस बिझनेस इन्फोसारखाच असेल. परंतु त्यात तुम्हाला नव्याने सर्च ऑप्शन मिळेल. तो वापरून जवळची दुकाने शोधू शकता. मोठ्या ऑनलाईन शॉपमुळे छोट्या किराणा दुकानांचे अथवा छोट्या हॉटेलांचे नुकसान होत आहे. ते थांबवता येईल. छोटे उद्योगही जगतील. मात्र ही सोय भारतात उपलब्ध होण्यासाठी थोडा धीर धरा. ती सोय झाल्यावर छोट्या उद्योगांना फायदा मिळणार आहे हे नक्की.