मुंबई – क्रेडीट कार्ड आता शहरापासून छोट्या गावांपर्यंत अत्यंत सर्वसाधारण बाब झाली आहे. व्यवहारासाठी तर शहरात क्रेडीट कार्डचा वापर एक नियमीत पद्धत म्हणून पुढे आली आहे. त्यात कुठलीही गोष्ट खरेदी करून नंतर पैसे देण्याची सोय आहे. क्रेडीट कार्ड मिळतातही अत्यंत सहजरित्या. मात्र बरेचदा लोक जास्त पैसे खर्च करतात. अश्यावेळी कार्ड बंद करण्यासाठी धडपड सुरू होते. पण क्रेडीट कार्ड बंद करण्यापूर्वी काय करायला हवे ते बघुया…
थकबाकी भरा
जेव्हा तुम्ही क्रेडीट कार्ड बंद करण्याचा विचार करता तेव्हा सर्वांत पहिले आपल्यावर थकबाकी तर नाही ना याची खात्री करून घ्या. त्यासाठी सर्वांत पहिले थकबाकी भरून टाका. थकबाकीसह तुम्हाला क्रेडीट कार्ड बंद करता येत नाही.
क्रेडीट युटिलायझेशन रेश्यो (CUR)
CUR म्हणजे उपलब्ध क्रेडीट कार्डवरील मर्यादा आहे जी तुम्ही खर्च करताय. जर तुम्ही क्रेडीट कार्ड हंद करणार असाल तर हा रेश्यो वाढतो. अर्थात तुमच्याकडे २ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असेल तर ही मर्यादा लगेच ४ लाखांपर्यंत वाढते.
रिवॉर्ड पाईंट्सचा लाभ
बहुतांश क्रेडीट कार्ड कंपन्या कार्डावरून केलेल्या व्यवहारासाठी रिवॉर्ड पॉईंट्स देतात. क्रेडीट कार्ड अकाऊंट बंद करण्यापूर्वी रिवॉर्ड पॉईंट्स प्राप्त करायला विसरू नका. बँकेच्या मार्केटिंग भागिदाऱ्यांसोबत हे रिवॉर्ड्स कॅशबॅक डिस्काऊंट, कुपन आदी सेवांसाठी वापरले जाऊ शकतात.
फॉलोअप
बँक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे भरपूर कामं आहेत. त्यामुळे एक क्रेडीट कार्डधारक म्हणून कार्ड बंद करण्यासाठी वेळेवर अर्ज करायला हवा, हे लक्षात घ्या. बँकेकडून आपले नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका. तुम्हाला त्यासाठी फॉलोअप घ्यावा लागेल.