इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पुर्वीच्या काळात कर्ज काढणे म्हणजे जणू काही पाप समजले जात असे, परंतु आजच्या काळात प्रगती करायची असेल तर कर्जाशिवाय पर्याय नाही, असे म्हटले जाते, ते प्रत्यक्षात खरे ही ठरते. प्रत्येकाला कधी ना कधी अचानक पैशांची गरज भासते. अशावेळी अनेक जण कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, तुमचे आधीच कोणते कर्ज असेल तर बँका तुम्हाला पुन्हा कर्ज देत नाहीत. अशा वेळी टॉप अप कर्ज तुमच्या उपयोगी पडू शकते. बँकाही टॉप अप कर्ज देण्यास टाळाटाळ करत नाहीत.
वास्तविक एकदा कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते भरतानाच अनेकदा दमछाक होते. पण काही वेळा अडचणीच अशा येतात की कर्जाची पुन्हा गरज भासते. अशा वेळी काय करायचे असा प्रश्न पडतो. तुम्ही नियमित कर्जाचे हप्ते फेडणारे कर्जदार असाल तर अशा प्रसंगी टॉप अप लोनचा पर्याय वापरता येईल. पर्सनल लोन, बिझनेस लोन, प्रॉपर्टी लोन, एज्युकेशन लोन अशा कोणत्याही कर्जावरही टॉप अपची सुविधा मिळते. पण सर्वधाधारणपणे गृहकर्जावरील टॉप अप लोन फायदेशीर ठरते.
टॉप अप लोनचा वापर मुलांची फी, शॉपिंग, दुकान किंवा घर खरेदी, मुलांचे लग्न, घराचे नुतनीकरण, वैद्यकीय खर्च अशा कोणत्याही कारणासाठी करता येतो. याबाबतची स्पष्ट कल्पना बँकेला देणे गरजेचे असते. या कर्जाची परतफेड जुन्या कर्जाच्या कालावधीपर्यंत करु शकता. उदाहरणार्थ, आपण 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले असेल आणि पाच वर्षांनी टॉप अप लोन घेत असाल तर त्याचा कालावधी १० ते १५ वर्षाचा ठेवू शकता.
या कर्जावरील व्याजदर हा गृहकर्जावरील व्याजाप्रमाणेच आकारला जातो. त्यामुळे पर्सनल लोनपेक्षाही कमी व्याजदरात आपल्याला कर्ज उपलब्ध होते. कर्जाचा कालावधी जेवढा कमी राहील, तेवढे व्याज कमी जाईल. बँक अधिकार्यांशी चांगली चर्चा केल्यास टॉप अप कर्ज सहजपणे मिळू शकते. टॉप अप लोन हे मूळ कर्जापेक्षा अधिक घेता येत नाही. तसेच या लोनचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे यासाठी आपल्याला फारशी कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. कारण मूळ कर्ज घेताना आपण सर्व प्रक्रिया पार पाडलेल्या असतात. तसेच त्यावेळच्या उत्पन्नापेक्षा उत्पन्नही वाढलेले असते. त्यामुळे उत्पन्नाची माहिती, आयकर रिटर्नस, अन्य काही प्राथमिक कागदपत्रे दिल्यानंतर थोड्या दिवसांतच हे कर्ज मंजूर होते.
सध्या बँका आणि फायनान्स कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले ग्राहक शोधत असतात. वेळेत कर्जाचा हप्ता भरणारे बँकेचे जुने ग्राहक तसेच त्यांचा सीबील स्कोअर चांगला असतो अशा ग्राहकांना त्यांचा जुना रेकॉर्ड पाहून अतिरिक्त लोन देण्यासाठी ऑफर देण्यात येते.यालाच टॉपअप लोन म्हणतात.सध्या बँका मालमत्ता कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर टॉपअप लोन देतात. अशा ग्राहकांना बँकांमार्फत टॉपअप लोनसाठी फोन, मेसेज आणि मेल्स येत राहतात.
टॉपअप लोन कधी घ्यावे तसेच त्याचे फायदे कोणते आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. जर मुलांचे लग्न, शिक्षण, व्यवसाय किंवा आजारपणासाठी जास्त पैशांची गरज असते तेव्हाच टॉपअप लोन घेणे फायद्याचे ठरते. फिरण्यासाठी किंवा लक्झरी वस्तू खरेदी करण्यासाठी टॉप अप लोन घेतल्यास अयोग्य ठरते. टॉपअप लोन घ्यायचे असल्यास गृहकर्जावर घेण्याचा विचार करावा. हा पर्याय नसल्यास मालमत्तेच्या कर्जावर टॉपअप लोन घेऊ शकता. वैयक्तिक कर्जावर टॉपअप लोन हा शेवटचा पर्याय ठेवावा. याचे कारण म्हणजे वैयक्तिक लोन हे इतर कर्जापेक्षा अधिक महाग असते.
जेव्हा तुमच्याकडे आधीच वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज असेल आणि निधीची आवश्यकता असेल तेव्हा टाॅप अप कर्ज कधी घ्यावे, तुम्हाला अतिरिक्त कर्जाची गरज आहे आणि बँकेला भेट देण्याचा आणि कागदपत्रे देण्याचा त्रास टाळायचा आहे. ज्यांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त कर्जे काढायची नसतात त्यांनी टॉप अप कर्ज घेतले पाहिजेत. टॉप अप कर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँकेचे विद्यमान ग्राहक असल्याने तुमचा कर्ज अर्ज लवकर मंजूर होतो आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे टॉप अप लोन घेतल्यानंतरही तुमच्या सध्याच्या कर्जाचा कालावधी वाढत नाही. याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही टॉप अप लोन घेताना तुम्हाला बँकेकडे अतिरिक्त काहीही गहाण ठेवण्याची गरज नसते.
शक्यतो, टॉपअप लोन मंजूर करताना बँक ग्राहकाचा मागील सहा महिन्यांचा रेकॉर्ड चेक करतात. टॉपअप लोन मंजुरीसाठी ही सर्वात मोठी अट आहे. त्यानंतर बँक ग्राहकांच्या अतिरिक्त लोनच्या परतफेडीचं आकलन करते. तुमची टॉप अप लोन परतफेडीची क्षमता चांगली असल्यास बँक कर्ज मंजूर करते. कर्जफेडीची क्षमता तपासण्यासाठी बँका तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि मासिक उत्पन्न आणि खर्चाचं आकलन करतात. टॉपअप लोन जुन्या कर्जाच्या तुलनेत ३ ते ४ टक्के महाग असते. मुख्य बँका गृहकर्जाच्या टॉपअप वर ७.५ ते ९.३० टक्के इतके व्याज आकारतात.
Finance Topup Loan Criteria Procedure
Banking