गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महागाई वाढण्याचे हे आहे कारण…. निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच सांगितलं…

by India Darpan
एप्रिल 27, 2023 | 7:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Nirmala sitaraman

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात महागाई वाढत असल्याच्या कारणाने विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जाते. परंतु, महागाई वाढण्यामागची तांत्रिक कारणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र अलीकडेच एका पत्रकार परिषदेत देशात महागाई वाढण्याची कारणं सांगितली.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन कर्नाटकातील कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पण यात प्रामुख्याने महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. निर्मला सीतारामन यांनी देशात महागाई वाढण्यामागे हंगामी समस्या कारणीभूत आहेत, असे म्हटले आहे. ‘हंगामी पातळीवर पुरवठ्यांशी संबंधित समस्यांमुळे महागाई वाढली आहे. जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता आणि त्यांच्या किमती यावर सरकार लक्ष ठेवून आहे.

परिस्थितीनुसार आवश्यकता लक्षात घेता अतिरिक्त साठा जारी करण्यात आला. तांदळाचे भाव वाढले तेव्हा आम्ही बफर स्टॉकमधून तांदूळ दिला. तरीही केंद्र सरकार दर कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे किरकोळ महागाईचा दर आता ६ टक्क्यांच्या खाली आला आहे,’ असे सीतारामन म्हणाल्या. गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं गहू खरेदीला गती दिली आहे. चालू आर्थिक वर्षात ३.४१ कोटी टन गहू खरेदी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत १.७० कोटी टन गव्हाची खरेदी झाली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गव्हाच्या खरेदीला गती देणे आवश्यक आहे. जेणेकरून पुरवठ्यानुसार किरकोळ बाजारात गव्हाचा पुरवठा करता येईल. पुरठ्याबाबत काही गडबड झाल्यास गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यतादेखील निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली.

इंधनाचे दर योग्य पातळीवर
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या बाबतीतही त्यांनी स्पष्ट केले. इंधन आणि नैसर्गिक वायूच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंधन आणि नैसर्गिक वायूची आयात केली जाते. पण कोरोना, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे परिणाम होत आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

Finance Minister Nirmala Sitharaman on Inflation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वाक्य जिव्हारी… एकनाथ शिदेंनी असं दिलं जोरदार प्रत्युत्तर…

Next Post

धर्मादाय रुग्णालयांबाबत आरोग्य मंत्र्यांनी दिले हे आदेश

India Darpan

Next Post
1140x570 13

धर्मादाय रुग्णालयांबाबत आरोग्य मंत्र्यांनी दिले हे आदेश

ताज्या बातम्या

Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011