इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मुलीने लग्नगाठ बांधली आहे. केंद्रीय मंत्र्यांची मुलगी परकला वांगमयीने गुजरातमधील प्रतीक दोषीशी त्यांच्या बेंगळुरू येथील घरी एका साध्या सोहळ्यात विवाह केला. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा विवाहसोहळा बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये पार पडला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात फक्त कुटुंबीय आणि काही मित्र उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कोणत्याही राजकीय दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादाने हिंदू परंपरेनुसार प्रतीकसोबत परकालाचा विवाह झाला.
सीतारामन यांची कन्या परकला वांगमयी या फिचर लेखिका आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पत्रकारितेचा अभ्यास केला. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये कन्या दिनानिमित्त परकालासोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता. एका ट्विटमध्ये त्यांनी परकला हे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक असे वर्णन केले आहे.
गुजरातचे रहिवासी असलेले प्रतीक दोषी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास सहाय्यकांपैकी एक आहेत. प्रतीक हे पंतप्रधान कार्यालयात (PMO) विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) आहेत. २०१४ मध्ये ते पंतप्रधान कार्यालयात पोहोचले, जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर जेव्हा मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा जून २०१९ मध्ये त्यांची संयुक्त सचिव पदावर ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रतीक दोषी हे सिंगापूर मॅनेजमेंट स्कूल ग्रॅज्युएट आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात सीएमओमध्ये त्यांनी संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. प्रतीक सध्या पीएमओमध्ये संशोधन आणि रणनीतीवर काम करतात.
Finance Minister Nirmala Sitharaman Daughter Wedding