बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गोव्यात या तारखेला चित्रपट महोत्सव…तुम्ही करु शकता अशी नोंदणी

ऑक्टोबर 22, 2024 | 11:45 pm
in संमिश्र वार्ता
0
420RG

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) पणजी, गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. गोवा राज्यातील अरबी समुद्राच्या नेत्रदीपक पार्श्वभूमीवर सिनेमाचा आनंद साजरा करण्यासाठी जगभरातील चित्रपट प्रेमी येथे एकत्र येतात.

जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतले असणा-यांना इफ्फी चित्रपटांबद्दलच्या प्रेमासाठी एकत्र येण्याची संधी देते. येथे बंध साजरे करण्यासाठी, सर्वांना कथाकथनाचा आनंद आणि मोठ्या स्क्रीनची जादू अनुभवण्यासाठी आनंद घेता येतो. यासाठी https://my.iffigoa.org/ वर नोंदणी करू शकता आणि या वर्षीच्या महोत्सवासाठी इफ्फी प्रतिनिधी बनता येईल.

इफ्फीला उपस्थित का रहावे ?
55 व्या इफ्फी मध्ये, तुम्हाला 16 क्युरेटेड सेगमेंटमध्ये जगभरातील चित्रपटांची वैविध्यपूर्ण श्रेणी पहायला मिळेल. तुम्हाला हृदयस्पर्शी नाट्य , थरारक माहितीपट किंवा नाविन्यपूर्ण लघुपट आवडत असतील तर या महोत्सवात प्रत्येक चित्रपट रसिकांना आनंद देणारे काही ना काही आहे.

प्रतिनिधींना इतर कोणाच्याही आधी अनेक चित्रपट पाहण्याची खास संधी असणार आहे कारण अनेक चित्रपटांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रीमियर येथेच इफ्फीमध्ये होणार आहेत.मात्र केवळ चित्रपट पाहण्यापुरते हे मर्यादित नाही ; तर कथा सांगण्याची कला देखील इथे शिकता येईल !

इफ्फीमध्ये दिग्गज चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा आणि मास्टर क्लासेस सादर केले जातात , जे त्यांचे विचार आणि अनुभव सामायिक करण्यास उत्सुक असतात. प्रत्यक्ष चर्चेत सहभागी व्हा , तुमच्या कल्पना मांडा आणि सीमांच्या पलीकडे जाऊन मैत्री करा आणि जर तुम्ही उत्कट आणि नवोदित चित्रपट निर्माते असाल तर तुमचा पुढचा मोठा प्रकल्प साकार होऊ शकेल.

तुम्हाला चित्रपट उद्योगातील भपका आणि प्रसिद्धी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देखील मिळेल.इफ्फी रेड कार्पेटमध्ये प्रख्यात चित्रपट निर्माते, अभिनेते आणि मान्यवरांचा समावेश आहे जे त्यांचे काम सर्वांसमोर आणण्यासाठी आणि सिनेमाबद्दलचे त्यांचे प्रेम सामायिक करण्यासाठी एकत्र जमतात. इफ्फी प्रतिनिधींना चित्रपट निर्माते, अभिनेते आणि या उद्योगातील तज्ञांना भेटायची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळेल. कल्पना करा, तुमच्या आवडत्या चित्रपटांना पडद्यावर साकार करणाऱ्या लोकांसोबत प्रत्यक्ष चर्चा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे.

याव्यतिरिक्त , इफ्फी पुन्हा एकदा ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’, ‘फिल्म बझार ’ आणि ‘सिने मेला’ 2024 ची आवृत्ती घेऊन येत आहे जे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवोदित प्रतिभावंतांसाठी आणि एकूणच चित्रपटांशी संबंधितांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ बनवते. चला तर, आयुष्यभराच्या अनुभूतीसाठी सज्ज व्हा. या अनोख्या सिनेसृष्टीच्या प्रवासाचा भाग बनण्याची तुमची संधी हुकवू नका.

इफ्फी मध्ये प्रवेशयोग्यता
सर्वसमावेशकतेच्या प्रयत्नात, महोत्सव स्थळाची संरचना ही विनाव्यत्यय अनुभूतीची खबरदारी घेत विविध सुविधांसह प्रवेश करण्याजोगी केली आहे. दिव्यांगजनांच्या विशेष गरजांसाठी याठिकाणच्या पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. चित्रपटांचा आनंद घेण्यापासून कोणी वंचित राहू नये यासाठी ईएसजीचा परिसर आणि चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या इतर ठिकाणांना रॅम्प, रेलिंग, दिव्यांगजनांसाठी अनुकूल टँटाइल वॉकवे, पार्किंग स्पेस, रेट्रोफिटेड टॉयलेट, ब्रेलमधील साइनबोर्ड इत्यादी तरतुदींसह कोणतीही कसर न ठेवता सुसज्ज करण्यात आले आहे.

नोंदणी कशी करावी?
नोंदणीसाठी, https://my.iffigoa.org/ वर लॉग इन करा.55 व्या इफ्फी साठी प्रतिनिधी नोंदणी ही महोत्सवाच्या सांगतेपर्यंत सुरू राहील. यासाठीच्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत:

चित्रपट व्यावसायिक
नोंदणी शुल्क: 1180 रुपये (18% जीएसटी सह)
फायदे: ऑनलाइन मान्यता, अतिरिक्त तिकीट आणि पॅनेल आणि स्क्रीनिंगमध्ये विनामूल्य प्रवेश.
सिने रसिक

नोंदणी शुल्क: 1180 रुपये (18% जीएसटी सह)
फायदे: ऑनलाइन मान्यता आणि पॅनेल आणि स्क्रीनिंगमध्ये विनामूल्य प्रवेश.
प्रतिनिधी – विद्यार्थी

नोंदणी शुल्क: नाही
फायदे: ऑनलाइन मान्यता, पॅनेल आणि स्क्रीनिंगमध्ये विनामूल्य प्रवेश, दररोज 4 तिकिटांच्या परवानगीसह.
ही वर्गवारी व्यावसायिक, सिनेरसिक आणि सिनेसृष्टीच्या विद्यार्थ्यांसाठी आखलेले वेगवेगळे फायदे देते. विद्यार्थ्यांना चित्रपट आणि कार्यक्रमांच्या विस्तृत प्रदर्शनासह दररोज 4 तिकिटांसह विशेष प्रवेश मिळतो, चित्रपट व्यावसायिकांना दररोज एक अतिरिक्त तिकिट मिळते.

महोत्सवादरम्यान सर्व कार्यक्रम आणि ठिकाणी सुव्यवस्थित प्रवेशाची खातरजमा करून प्रतिनिधींना ऑनलाइन मान्यता मिळते. तुमच्या वैयक्तिकृत डॅशबोर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचे My-IFFI खाते https://my.iffigoa.org/ तयार करा, जिथे तुम्ही तिकिटे बुक करू शकता आणि उत्सवाचे वेळापत्रक तपासू शकता. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, [email protected] वर संपर्क साधा. आता नोंदणी करा आणि सिनेकलेचा उत्सव एकत्र साजरा करूया.

तुम्ही गोव्याची तिकिटे बुक करून चित्रपट महोत्सवासाठी आमच्यासोबत सामील होताना तुमची उत्कंठा शिगेला पोहोचली असेल!

इफ्फी बद्दल
1952 मध्ये स्थापन झालेला, भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. आकर्षक कथानक आणि त्यामागील सर्जनशील व्यक्तींद्वारे चित्रपट प्रदर्शनाचे इफ्फी चे स्थापनेपासूनच उद्दिष्ट आहे. या महोत्सवात चित्रपटांना दाद आणि स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी, लोकांमध्ये समंजसपणाचे आणि सौहार्दाचे पूल बांधून वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेच्या नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जातो.

इफ्फी चे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा सरकारची एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि यजमान राज्य यांच्या सहकार्याने दरवर्षी केले जाते. 55 व्या इफ्फी च्या अद्ययावत माहितीसाठी www.iffigoa.org या महोत्सवाच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभेसाठी पहिल्या दिवशी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

Next Post

शिवसेना शिंदे गटाची पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर…नाशिक जिल्हयातून यांना मिळाली उमेदवारी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
CM Eknath Shinde 01

शिवसेना शिंदे गटाची पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर…नाशिक जिल्हयातून यांना मिळाली उमेदवारी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011