पोलिस ठाण्यात हाणामारी सहा जणांना अटक
नाशिक – चौकशीसाठी बोलविल्या परस्परविरोधी टोळक्याने पोलीस ठाणे आवारातच तुंबळ हाणामारी केल्याची घटना भद्रकाली पोलिस ठाणे आवारात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलीसांनी हाणामारी करणाऱ्या सहा जणांना जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल भिकन कासार (वय २४, भिमवाडी भद्रकाली), शांतीलाल चिंधा आहिरे (वय ४३, उपनगर), सिध्दार्थ गौतम सोनकांबळे (वय २२, भिमवाडी भद्रकाली), मोईन अली हुसेन पठाण (वय ४१, सहकारनगर भिमवाडी), लता पप्पु चासकर (वय ३५, लोखंडे मळा उपनगर), अश्विनी राहूल कासार (भिमवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परस्परविरोधी संशयीतांना गुरुवारी (दि.३०) रात्री पोलीसांनी चौकशीसाठी बोलविले होते. मात्र एकाच वेळी दोन्ही गटातील संशयीत आवारात आल्याने ही घटना घडली. दोन्ही गटातील संशयीता समोरासमोर आल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पोलीस नाईक मिलींद सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाकल करण्यात येवून संशयीतांना अटक करण्यात आली आहे अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.
२९ हजाराला आॅनलाईन गंडा
नाशिक – फोन पे कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे सांगून अज्ञात भामट्याने तोफखाना केंद्रातील एकाला २९ हजार ९७१ रुपयांला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस टाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेशकुमार शर्मा (वय ३२, तोफखाना केंद्र,मूळ मध्यप्रदेश) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी ११ आॅगस्टला सायंकाळी पाचला तक्रारदारांना फोन पे कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून फोन आला कॅशबॅक मिळेल असे सांगून त्यांच्या स्टेट बॅकेच्या खात्यातून संशयित भामट्याने २९ हजार ९७१ रुपये लांबविले. पोलिस निरीक्षक पंकज भालेराव तपास करीत आहेत.
एटीएम कार्ड बदलून ३२ हजार लांबवले
नाशिक – पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृध्दास मदतीचा बहाणा करून भामट्याने एटीएम कार्डची आदला बदल करीत बँक खात्यातील ३२ हजाराच्या रोकडवर डल्ला मारल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर सिध्देश्वर आगलाव (वय ६६, दत्तमंदीर नाशिक रोड) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला आहे. बुधवारी (ता.२९) साडे पाचला तक्रारदार शंकर आगलाव हे स्टेट बॅकेतच्या एटीएममध्ये पैसे काढायला गेले
असता, तेथे उपस्थित असलेल्या दोघा अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले व त्यांनी गुपचुप त्यांच्या पीन क्रमांक
पाहून त्यानंतर एटीएम काडार्ची आदलाबदल करुन त्यांच्या मुलाच्या बॅकेच्या खात्यातून ३२ हजार रुपये काढून
फसवणूक केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश भामरे करीत आहे.
घरफोडीच्या संशयातून एकास अटक
नाशिक – घरफोडी करण्याच्या इराद्याने लपून बसलेल्या एका चोरट्यांस पोलीसानी बेड्या ठोकल्या. लेव्हीट मार्केट भागात संशयीत घरफोडी करण्याच्या तयारीत होता. याप्रकरणी देवळाली कॅ म्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल किसन गाडर (वय ३७, गौरी पटांगण पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी
(दि. ३०) मध्यरात्री दोनच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील लेव्हीट मार्केट परिसरातील घरफोडीच्या उद्देशाने लपून बसल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी पोलिस शिपाई स्वप्नील बाळासाहेब जुंद्रे (वय २९, ) यांच्या तक्रारीवरुन पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.