बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

“आत्ता कुठे लढाईला सुरवात झाली असे समजा”, छगन भुजबळांनी केले स्पष्ट

by Gautam Sancheti
सप्टेंबर 19, 2022 | 5:57 pm
in राज्य
0
IMG 20220919 WA0022

 

नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील ओबीसी समाजाने काही दिवसांपुर्वीच एक मोठी लढाई यशस्वीपणे लढली आणि विजय मिळवला. आपल्या हक्काचे असलेले राजकीय आरक्षण गेले होते. मात्र ते पुर्ववत करण्यास आपल्याला यश आले आणि राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसींना न्याय मिळाला.आपली लढाई ही इथेच संपत नाही. आपल्याला अजुन लढायच आहे.काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच आरक्षण कमी झालं आहे.ओबीसींच २७ टक्के आरक्षण कायम रहायला हवं यासाठी आपला लढा सुरुच राहणार असून सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन हा लढ्यात सहभागी व्हावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश व अखिल भारतीय महात्मा फ़ुले समता परिषद यांच्या वतीने कृतज्ञता सोहळा पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. राममनोहर लोहीया म्हणायचे ‘सड़कें खामोश हो गई तो संसद आवारा हो जाएगी’ त्यामुळे आपण शांत राहीलो तर आपल्या हक्काच्या गोष्टीसुद्धा हे मनुवादी विचाराचे लोक हिरावुन घेतील. त्यामुळे आपल्याला आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे, बहुजन समाजाचे प्रबोधन केलेच पाहीजे. काही वर्षांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही सर्व अतिशय व्यथित झालेलो होतो. हे आरक्षण पूर्ववत होण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि विविध ओबीसी संघटनांनी वेळोवेळी अनेकदा आंदोलने केली त्या सर्वांचे हे सामुहिक यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, ज्या बांठिया आयोगाच्या अहवालामुळे आपले राजकीय आरक्षण पुर्ववत झाले त्यात अनेक त्रुटी आहे. अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना करायला हव्यात. केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आपली सुरवाती पासूनची मागणी आहे मात्र केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी अशी आपली आग्रही मागणी राहणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील ओबीसी सध्या भरडला जात आहे त्यामुळे ओबीसी घटकाला देखील एससी आणि एसटी प्रमाणे घटनात्मक आरक्षण मिळालेच पाहीजे.

ते म्हणाले की, झारखंड मध्ये ७७ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. आपल्याकडे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना कमी आरक्षण मिळाले आहे.ओबीसींच २७ टक्के आरक्षण कायम राहायला हव यासाठी आपल्याला लढा लढावा लागणार आहे. आपली लढाई अजून संपली नाही.आताशी सुरु झाली आहे. ‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन,अभी तोलना आसमान बाकी है’ असे सांगत आत्ता कुठे लढाईला सुरवात झाली असे समजा आणि पुन्हा नव्या दमाने लढा असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवाना केले.

ते म्हणाले की, समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. काही लोक जाणून बुजून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. महापुरुषांचे विचार आपल्याला समाजात पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात आपण गेले पाहीजे. फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या लोकांमागे आपण उभे राहिले पाहिजे. फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, आज राज्यात आपले सरकार नाही, हे सरकार ओबीसीच काय महाराष्ट्राचा विचार सुद्धा करत नाही. महाराष्ट्राच्या वाट्याचा असलेला वेदांचा फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरात ला दिला महाराष्ट्राच्या वाट्याच्या हक्काच्या गोष्टी गुजरातला दिल्या जात आहेत. गुजरातमधील आर्थिक राजधानी आणि उदयोन्मुख आर्थिक राजधानी गिफ्ट सिटी म्हणून हळूहळू मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच अन्नधान्यावर जीएसटी लावला गेला आहे. अगदी अंत्यविधीच्या साहित्याला देखील जीएसटी लावला जात असल्याने मेल्यानंतरही त्रास देण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. या विरुद्ध आपण बोलले पाहिजे, शिक्षणावर बोलले पाहिजे, रोजगारावर बोलले पाहिजे, आरोग्यावर बोलले पाहिजे आपल्या आरक्षणावर बोलले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ.जितेंद्र आव्हाड,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, आ. शशिकांत शिंदे, आ.रोहित पवार, आनंद परांजपे, बापू भुजबळ, बाळासाहेब कर्डक, राज राजापुरकर, सुरज चव्हाण, प्रशांत पाटील, किरण झोडगे, राजू मुलानी, रुपेश ठाकूर, सलीम बेग, नामदेव भगत, प्रा. नारायण खर्जे, सलीम सारंग, सुभाष देवरे, देवकी शिंदे, प्रकाश ढोकणे, पं.अवधेश शुक्ला, राजू शिंदे, चंदू पाटील, भालचंद्र नलावडे, संदीप सुतार, सुलतान मालदार, कल्पना भालेराव, भावना घाणेकर, गणेश शिंदे, जी.एस.पाटील, सतिष पाटील, नितीन चव्हाण, बाळासाहेब बोरकर, सुनिता देशमुख यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Fight is now Started NCP Leader Chhagan Bhujbal
OBC Reservation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

50MP कॅमेऱ्यासह हे तगडे स्मार्टफोन अवघ्या १० हजारापेक्षा कमी किंमतीत

Next Post

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रलोभनांपासून दूर रहावे, जाणून घ्या,बुधवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0355 1
स्थानिक बातम्या

नाशिकच्या आधाराश्रमातील कर्णबधिर बालकाला अमेरिकेतील दाम्पत्याने घेतले दत्तक…

सप्टेंबर 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात झाली ही वाढ

सप्टेंबर 16, 2025
election11
संमिश्र वार्ता

या विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…

सप्टेंबर 16, 2025
nsp 1024x305 1
राष्ट्रीय

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे अंतिम तारीख….

सप्टेंबर 16, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
Next Post
40x570 3

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011