नाशिक – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष किरण फडोळ यांनी आपला वाढदिवस ग्रामवासियांना कोरोनाचे औषध देऊन साजरा केला. कोविड-१९ चे औषध आमदार सरोजताई आहेर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. गौरव गोवर्धने यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंगसरे ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामवासियांना वाटप केले.
नाशिक मध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रुग्णालयात जागा मिळत नसल्याने ते घरातच उपचार घेत आहे. परंतु उपचार घेत असलेले रुग्ण गोरगरीब असून त्यांच्याकडे औषध घेण्याची परिस्थिती नसल्याने अशा कुटुंबातील रुग्णांकरिता मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष किरण फडोळ यांनी आपला वाढदिवसानिमित्त ग्रामवासियांना उपचाराकरिता लागणारे औषध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केले.
यावेळी मुंगसरे गावचे सरपंच भाऊसाहेब म्हैसधूने, उपसरपंच शितलताई भोर, सदस्य रामदास उगले, रोहिणी ताई फडोळ, शशी थेटे आदि उपस्थित होते.