इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न हे पवित्र बंधन आहे. यामुळे दोन जीव नव्हे तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. सरत्या वयात जोडीदाराची साथ महत्त्वाची मानली जाते. मात्र ते कितीवेळा केलं जावं याबाबत अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने एक, दोन वेळा नव्हे तर पाच वेळा लग्न केलं आहे.
शौकत असे या व्यक्तीचे नाव असून व्यक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हा शौकत पाकिस्तानचा रहिवासी आहे. ही व्यक्ती ११ मुलांचा पिता असून त्याला १० मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी आठ मुलींचं लग्न झालं असून, मुलाचंही लग्न झालं आहे. त्याच्या कुटुंबात तब्बल ६२ सदस्य आहेत. तर मुलांनीच या व्यक्तीला लग्नासाठी गळ घातली होती.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शौकत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मला लग्न करायचं नव्हतं; पण दोन मुलींच्या हट्टापुढे मी हार मानली. माझ्या आठ मुलींची लग्नं झाली आहेत. घरात दोनच मुली राहिल्या होत्या. लग्नानंतर माझ्याबरोबर कोणी नसेल म्हणून मुली माझ्या पाचव्या लग्नाच्या मागे लागल्या. दोन्ही मुलींनी माझ्यासाठी मुलगी शोधली आणि त्यांच्या लग्नाच्याच दिवशी लग्न लावून दिलं. शौकत यांच्या चारही पत्नींचं निधन झालंय. नव्या लग्नाबद्दल बोलताना शौकत सांगतात, ‘आयुष्यात प्रत्येकाला प्रेम मिळत नाही आणि मला ५-५ वेळा मिळालं. मुलींची इच्छा होती, की मी पुन्हा लग्न करावं. कारण मलाही माझं आयुष्य जगायचं आहे. म्हणूनच मीही हो म्हणालो.’ शौकत यांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यांना ४० नातवंडं आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात एकूण ६२ सदस्य आहेत आणि संपूर्ण कुटुंब एकत्र राहतं.
शौकत यांच्या नव्या आणि पाचव्या पत्नीलाही एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबाची कोणतीही अडचण नाही. घरात एक वेळच्या जेवणासाठी संपूर्ण कुटुंबासाठी सुमारे १०० पोळ्या बनवल्या जातात. त्यांच्या बायकोलाही याचा काहीच त्रास नाही. ‘ती म्हणते, मला मोठं कुटुंब आवडतं आणि मी हळूहळू या कुटुंबाशी पूर्णपणे जुळवून घेईन, असं शौकत यांनी सांगितलं. शौकत यांच्या पाचव्या लग्नाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
fifth marriage 11 children’s Pakistani man social viral