मुंबई – गर्भावस्थेत पोटातल्या बाळाच्या ह्रदयाचे ठोके आणि इतर गोष्टींच्या तपासणीसाठी महिलेला वारंवार सोनोग्राफीसाठी घराच्या बाहेर पडावे लागते. या धावपळीमुळे गर्भवतींना खूप त्रास सहन करावा लागतो. मात्र आता घरीच या गोष्टी करता येतील, असे उपकरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे घरबसल्या पोटातल्या बाळाच्या ह्रदयाचे ठोके ऐकता येणार आहेत.
तंत्रज्ञानाच्या आधारावर महिलांना सोप्या पद्धतिने उपचार मिळावा, या उद्देशाने डॉ. एपीजे अब्दूल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठात संशोधन सुरू झाले. त्यात त्यांना यश मिळाले असून उत्तम उपकरण तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांकडे उपकरणे नसतात किंवा महिलांना वारंवार सोनोग्राफीसाठी गावाच्या बाहेर जाणे शक्य नसते. अश्या ठिकाणांवर हे उपकरण एक वरदान ठरणार आहे.
विद्यापीठातील सेंटर फ़र अॅडव्हान्स स्टडीजच्या संशोधकांच्या टीमने फिटर हार्ट रेट (एफएचआर)चा उपयोग करून हे उपकरण तयार केले आहे. प्रक्रियेदरम्यान डॉप्लर व सेंसरच्या मदतीने गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाकडून सिग्नलच्या रुपात डेटा कलेक्ट करण्यात आला. त्यानंतर हे उपकरण आर्टिफिशियल इंटेलिजन्स व यंत्राच्या माध्यमातून बाळाच्या ह्रदयाचे ठोके व इतर बाबींची योग्य माहिती देते.
आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये संशोधन प्रकाशित
सीएएसचे संचालक डॉ. एम.के. दत्ता यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय जनरलमध्येही हे संशोधन प्रकाशित झाले आहे. देशात कोरोनाच्या दुसरी लाट वाढच असताना झेक प्रजासत्ताकमधील एका रुग्णालयात 500 हून अधिक गर्भवतींवर संशोधन म्हणून या उपकरणाचा प्रयोग करण्यात आला.