मुंबई – सध्याच्या काळात प्रत्येकालाच आपले स्वतःचे एक वाहन असावे, असे वाटते. आपण दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण टाटा मोटर्सपासून ते एमजीपर्यंत अनेक वाहन कंपन्यांनी सणासुदीच्या काळात त्यांची नवीन वाहने लाँच करण्याची घोषणा केली आहेत. टाटा मोटर्सने सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही लाँच करणार आहे, तर एमजीची अॅस्टर लॉन्च होत आहे. त्यामुळे दिवाळीत कार खरेदी करण्यासाठी विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. त्याविषयी आता जाणून घेऊ या…
मारुती सेलेरियो
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी लवकरच नवीन पिढीतील सेलेरियो भारतात लाँच करण्याची घोषणा करू शकते. कारण चाचणी दरम्यान अनेक वेळा कारची तपासणी केली गेली असून सणासुदीच्या काळात ती विक्रीसाठी उपलब्ध होईल. नवीन कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये दिसतील.
टाटा पंच
टाटा मोटर्स ही ग्राहकांना परवडणारी मायक्रो एसयूव्ही लॉन्च केली आहे. या कारची किंमत 5 ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. कंपनी या कारला 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. टाटा पंचला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर विंडो, पॉवर-अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा, आयआरए कनेक्टेड कार टेक सारखी वैशिष्ट्ये मिळतील.
एमजी अॅस्टर
सदर कार 7 ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार असून ती थेट ह्युंदाई, स्कोडा आदी वाहनांशी स्पर्धा करेल. अॅस्टर कार ही दोन पेट्रोल इंजिनमध्ये येईल – 1.5L VTi नैसर्गिक आकांक्षा आणि 1.3L टर्बोचार्ज्ड पर्याय. अॅस्टर मध्ये एआय सिस्टम सहाय्यक देण्यात आले आहे, या कारमध्ये हिंदी व इंग्लिशमध्ये व्हॉईस कमांड देखील दिले जाऊ शकतात.
न्यू फोर्स गुरखा
महिंद्रा थारशी स्पर्धा करण्यासाठी येणारा न्यू फोर्स गुरखा भारतीय बाजारात दाखल झाली आहे. नवीन कारमध्ये अनेक अपडेट्स दिसतील. यामध्ये, स्पोर्टी दिसणारे एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन डिझाईनचा फ्रंट बम्पर, टेललाइट्स आणि ग्रिलही देण्यात आले आहेत. त्याला 2.6 लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन दिले जाईल, जे 89 बीएचपीची पॉवर आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करेल.