नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या पितृपक्ष सुरू असून दोन दिवसांनी नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर लगेचच दसरा दिवाळी सण उत्सवाची लगबग सुरू होईल, म्हणजे आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने घरोघरी नानाविध पदार्थ बनवण्याची तयारी सुरू होणार आहे, यासाठी किराणा दुकानावर देखील गर्दी होणार होत आहे, मात्र त्याच वेळी तांदळाचे सुमारे ५ ते २० रुपये भाव वधारणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार असून गृहिणींचे बजेट कोलडणार आहे.
साहजिकच सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी होत आहे, एकीकडे खाद्यतेल आणि पेट्रोलसह काही वस्तूंचे भाव कमी होत असताना आता केंद्र सरकारकडून तांदळाचे भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने जनतेमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी भाताची भारतातून परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती, मात्र आता भात यंदा भाताचे उत्पन्न कमी होणार असे दिसताच त्यावर निर्यात बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
जगातील भात लागवड व उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा वरचा क्रमांक लागतो. म्हणजेच भारतात मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. परंतु यंदा या भात लागवडीत सरासरी सुमारे १३ ते १५ टक्क्यांनी घट झाल्याचे म्हटल जात आहे. साधारणतः भात लागवडीच्या प्रदेशात जून महीन्यात यंदा पावसाने आवणीच्या तोंडावरच दडी मारली. त्यामुळे भाताचे उत्पादन घेणारे उत्तरप्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यात तेव्हा पाऊस कमी झाला. तर नंतरच्या कालखंडात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भाताचे पीक देखील वाहून गेले. त्यामुळेच भारतात यंदा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १०० लाख टनांहून अधिक यंदा तांदळाचे उत्पादन घटू शकते.
देशात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून निर्यातबंदीची गरजच नाही असे केंद्र सरकारकडून यापूर्वी वारंवार जाहीर करण्यात आले आहे. असे असताना गव्हाप्रमाणेच तांदळाच्या बाबतीतही केंद्र सरकारने आपली भूमिका बदलत तांदळावर निर्यातबंदी लागू केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. वास्तविक गेल्या चार महिन्यात भारतातून जवळपास ७३ लाख टन तांदळाची निर्यात करण्यात आली आहे. एकीकडे सरकारी गोदामात तांदळाच्या साठ्यात सतत घट होत आहे.मात्र दुसरीकडे तांदळाच्या निर्यातीत सतत वाढत होती. सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सध्या केंद्राकडे तांदळाचा एकूण गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ लाख टनांनी कमी आहे.
या सर्वच घडामोडी आणि व्यवहाराचा परिणाम म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेत लवकच तांदळाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नुकताच तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतातून ८५ देशांना तांदळाची निर्यात होते. तसेच दोनपासून निर्यातीतही वाढ झाली आहे. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांपासून तांदळाचे दर वधारत आहेत. त्यातही प्रामुख्याने बासमती तांदळाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.
भारतात, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, बंगाल, पंजाब, हरियाणा यासारख्या राज्यात तसेच महाराष्ट्रात कोकण प्रांत, विदर्भात गोंदिया गडचिरोली आदिभागात तांदळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथील शेतकरी पांरपरिक बासमती तांदळाऐवजी अन्य तांदळाच्या लागवडीकडे वळाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून पारंपरिक बासमतीची लागवड कमी होत आहे. तसेच सध्या बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीत ११ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे तांदळाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अन्न मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Festival Season Rice Price Hike Inflation
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/