गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सणासुदीत सर्वसामान्यांना आणखी एक दणका; दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर कडाडणार

by Gautam Sancheti
सप्टेंबर 11, 2022 | 4:47 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दणका मिळणार आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या महिन्यात दूध कंपन्यांनी दुधाच्या किंमतीमध्ये प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली होती. आता लंपी स्किन आजारामुळे दुध उत्पादन घटल्यानं पुन्हा एकदा दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बहुतांश मिठाईतील प्रमुख घटक दूध असल्यानं येत्या काळात मिठाईचे दर देखील वाढणार आहेत. डेअरींनी दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे. दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून मिठाई तयार करण्यात येते. सणांच्या तोंडावरच दूध महाग झाल्याने त्याचा परिणाम मिठाईसह इतर उत्पादनांवरही दिसून येईल.

मिठाई तयार करण्यासाठी जवळपास 60 टक्क्यांपर्यंत दुधाचा वापर करण्यात येतो. दुधाच्या किंमती वाढल्याने तुमच्या आवडीच्या मिठाईचे दर ही प्रति किलो 10 ते 15 रुपायांनी वाढण्याची शक्यता आहे. दुधाच्या किंमती वाढल्याने मिठाई दुकानदार चिंताग्रस्त झाले आहे. तर मिठाईचे भाव वाढणार असल्याने ग्राहकांना मिठाईचा गोडवा महाग पडणार आहे.

गणेशोत्सव नुकताच संपला असून आता सर्वांना नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणाचे वेध लागले आहे. या सणात लागणारी दुधापासून तयार होणारी मिठाई महाग होण्याची शक्यता आहे. एकीकडे जनावरांना होत असलेल्या आजारामुळे दूध उत्पादन घटत आहे. तर दुसरीकडे चारा महाग होत असल्यानं दूध स्वस्त होण्याऐवजी महागच होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख दूध उत्पादक राज्यांमधील दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा फैलाव झाला असून त्याच कारणामुळे दूध उत्पादनाला फटका बसला आहे.

जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन’ हा त्वचेचा आजार असून, त्याच्या लक्षणांविषयी दुग्धशाळा, दूध उत्पादक संघ, ग्रामपंचायती आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांद्वारे जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. लागण झालेली संशयित जनावरे ओळखण्यासाठी खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकांच्या बाह्यरुग्ण विभागात निरीक्षण केले जाणार आहे. जनावरांची जीवित हानी टाळण्यासाठी प्रभावी उपचार केले जात आहेत. गुजरात आणि राजस्थाननंतर आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही लम्पी स्किनचा फैलाव होतोय. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही दोन राज्य दूध उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र लम्पी स्किन आजारामुळे या राज्यांमध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला

एकट्या राजस्थानमध्ये दहा हजारांहून अधिक जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. गुजरातमध्ये पाच हजार जनावरांचा मृत्यू झालाय.दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा फैलाव झाल्यानंतर दुधात 60 टक्के घट होते. लंपी स्किन आजारातून बरे झालेल्या जनावरांचं दूध उत्पादन त्याच स्तरावर येण्यासाठी वेळ लागतो.याच कारणांमुळे दूध उत्पादन प्रभावित होत आहे.दुध उत्पादन कमी झाल्यामुळे डेअरीच्या दूध संकलनातही घट झाली आहे.

महत्वाची बाब म्हणजे अनेक ठिकाणी दूध संकलनात चार ते पाच टक्क्यांनी घट झाली आहे.कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानं दूध संकलन घटले असून गेल्या वर्षी कोरोनामुळे संघटित क्षेत्रातील डेअरींकडेच दूधाचा पुरवठा होत होता. यंदा परिस्थिती सामान्य झाल्यानं असंघटित क्षेत्राकडेही दुधाचा पुरवठा वाढू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याचे दरही 15 ते 17 टक्क्यांनी वाढले आहेत. म्हणजेच दुध उत्पादकांच्या पशुखाद्याच्या दरात वाढ होणार आहे. मात्र दुसरीकडे दुधाच्या दरात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दूध दरवाढीचा थेट परिणाम दुग्धजन्य पदार्थांवर होणार आहे. मिठाईसाठी सर्वाधिक वापर खव्याचा होतो. खाव्यासाठी दूध आटवण्यात येते. पाच लिटर दूध उकळवल्यानंतर एक किलो खवा तयार करण्यात येतो. प्रति लिटर दूध दरात वाढ गृहित धरली तर पाच लिटर दुधासाठी मिठाई उत्पादकांना आता 10 ते 15 रुपये जादा मोजावे लागतील. परिणामी सर्वांची आवडती मिठाईही महाग होईल. दुधापासून खवा, रबडी, रस गुल्ला, बर्फी या मिठाईसोबतच पनीर, दही, ताक, लस्सी हे पदार्थ ही तयार करण्यात येतात. दूध उत्पादनाचा खर्च आणि बाजारातील मागणीची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत दुधाच्या दरात होण्याची शक्यता आहे.

Festival Season Milk and Milk Products Rate Will be Increase soon

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेमा इलेक्ट्रिकच्या ३ हायस्पीड इ बाईकचे अनावरण; ४ तासात चार्ज होणार, १२०च्या स्पीडने धावणार

Next Post

सैन्यदलातील जवान अविनाश पवार यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
IMG 20220911 WA0004 e1662891219158

सैन्यदलातील जवान अविनाश पवार यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011