नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न औषध प्रशासनाने दोन कारखान्यावर धाड टाकून बारा लाखाचे बनावट पनीर व भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सणावाराच्या दृष्टीने भेसळी उत्पन्न पदार्थांविषयी मोहीम सुरू केलेली असून त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. पहिली धाड मे. मधुर डेअरी अँण्ड डेली निडस अंबड नाशिक या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी अप्पासाहेब हरी घुले (वय ३९) हे विक्रेते हजर होते. या कारखान्यात अन्नसुरक्षा अंतर्गत असलेला परवाना आढळून आला नाही. त्यामुळे विनापरवाना बनावट पनीर व तुपाची विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्यामुळे येथे कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पनीर हे रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर करून बनावट रित्या तयार करण्यात येत असल्याचे आढळले. त्यामुळे येथून २ लाख ३५ हजार ७९६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई आनंद डेअरी फार्म म्हसरुळ या कारखान्यावर करण्यात आली. येथे आनंद वर्मा (५०) नामक व्यक्तीस विचारपूस केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्य तेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे सांगितले. त्याठिकाणी दूध पावडर, रिपाइन पामतेलाचा साठा उपलब्ध असल्याने सदरचे पनीराचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांची नमुने घेऊन त्यांचा एकूण ९ लाख ६७ हजार ३१५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरचे दोन्ही कारखाने सील करण्यात आलेले आहे. सदर दोन्ही कारखान्यावर कारवाई कारवाया अन्नसुरक्षा अधिकारी यांचे पथकाने सहाय्यक आयुक्त यांच्या निर्देशानुसार नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न ) उ. सी. लोकरे यांच्या निर्देशानुसार सहआयुक्त ग. सु. परळीकर अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली आहे.