शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

by India Darpan
एप्रिल 20, 2025 | 6:36 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Maha Gov logo 07 1 1024x512 1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज अॅनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल.

अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुसार, विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती ग्राहकांसमोर मांडणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अन्नाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम १८ (२)(e) नुसार, ग्राहकांना अन्नपदार्थातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच, अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन २०२० च्या प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसार, अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज अॅनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासून, पनीरच्या ऐवजी अॅनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्यास, किमान १० आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन घाडी-जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमन २०११ तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी) नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही केली जाईल.

विभागीय सह आयुक्त (अन्न) आणि सहा आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या कार्यशाळा घेऊन, पनीरच्या ऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करत असल्यास, त्याबाबत मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याबाबत तसेच कायद्यातील तरतुदींबाबत अवगत करावे. यासोबतच, ग्राहकांमध्ये याबाबत जनजागृती करावी.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला माफ केले जाणार नसून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, जाणून घ्या, रविवार, २० एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार…

Next Post
18 1 1024x683 1

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार…

ताज्या बातम्या

rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011