नाशिक – अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नाशिक विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तपासणी करुन ३२ लाख १५ हजार ३७३ चे ४ हजार ६६० किलो खाद्य तेल व इतर विविध अन्न पदार्थ जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे १५४ विविध अन्न पदार्थ खाद्य तेल, वनस्पती मिठाई व इतर खाद्यपदार्थाचे अन्न नमुने घेतले आहेत.
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सी. डी. साळुंके, सहाय्यक आयुक्त ग.सू. परळीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे, रासकर, सूर्यवंशी पाटील. देवरे, श्रीमती पाटील यांनी केली आहे. नाशिक विभागात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.