विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
थोड्याच कालावधीत सुरक्षा आणि चांगल्या परताव्यासाठी मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट ( एफडी ) ही एक गुंतवणूक आहे. अनेक लोक याचा उपयोग करतात. या महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये तीन खाजगी बँकांनी त्यांचे एफडी दर बदलले आहेत. आपण जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम अॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे दर जाणून घ्या …
आयडीएफसी फर्स्ट बँक: या महिन्याच्या 15 तारखेला, आयडीएफसी फर्स्ट बँकेने मुदत ठेवीचे दर बदलले आहेत. ही बँक FD वर 2.5 ते 5.25 टक्के पर्यंत व्याज देत आहे. 7 ते 29 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के व्याज, 30 ते 90 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के व्याज मिळेल. 91 दिवस ते 180 दिवसांसाठी FD घेतल्यावर 3.25 टक्के व्याज मिळेल. 181 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी FD वर 4.50 टक्के तर 1 वर्ष ते 2 वर्षे FD वर – 4.75 टक्के तसेच 2 वर्षांच्या FD वर 1 दिवस ते 3 वर्षे – 5.00 टक्के त्याचप्रमाणे 3 वर्षांच्या FD वर 1 दिवस ते 5 वर्षे – 5.20 टक्के आणि 5 वर्षांच्या FD वर 1 दिवस ते 10 वर्षे – 5.25 टक्के व्याज मिळेल.
अॅक्सिस बँक व्याज दर : अॅक्सिस बँकेचे नवे दर 9 सप्टेंबरपासून लागू आहेत. या दरांनुसार, बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7 ते 29 दिवसांसाठी 2.50 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 3 महिन्यांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 3 टक्के व्याज मिळेल. 61 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 6 महिन्यांपेक्षा कमी FD वर – 3.50%टक्के
6 महिने किंवा जास्त परंतु 11 महिन्यांपेक्षा कमी 25 दिवस – 4.40 टक्के, तर 11 महिने 25 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पण 1 वर्षापेक्षा कमी – 4.40 टक्के आणि 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी 5 दिवस – 5.10 टक्के तर 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा जास्त परंतु 1 वर्ष 11 दिवसांपेक्षा कमी – 5.15 टक्के त्याचप्रमाणे 1 वर्ष 11 दिवसांपेक्षा जास्त परंतु 18 महिन्यांपेक्षा कमी – 5.10 टक्के त्याशिवाय 18 महिन्यांपेक्षा 2 वर्षांपेक्षा कमी – 5.25
टक्के तर 2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी – 5.40 टक्के आणि 3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – 5.40 टक्के तसेच
5 वर्षे ते 10 वर्षे – 5.75 टक्के असा दर आहे.
कोटक महिंद्रा बँक : कोटक महिंद्रा बँकेनेही आपल्या एफडी दरांमध्ये सुधारणा केली आहे. हे नवे दर 8 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. 7 ते 30 दिवस- 2.50 टक्के,
31 दिवस ते 90 दिवस – 2.75 टक्के,
91 ते 120 दिवस – 3 टक्के,
121 ते 179 दिवस – 3.25 टक्के,
180 दिवस 4.25 टक्के,
181 दिवस ते 354 दिवस 4.40 टक्के,
365 ते 389 दिवस – 4.50 टक्के,
390 दिवस – 4.75 टक्के,
391 दिवस – 4.75 टक्के,
23 महिने – 4.9 टक्के,
23 महिने एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पण 4 वर्षांपेक्षा कमी – 5.10 टक्के,
4 वर्षे किंवा अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी – 5.20 टक्के असे दर आहेत.