मुंबई – आपल्यापैकी जवळपास प्रत्येकजण आज फेसबुक चा उपयोग करताना दिसून येतो. मात्र फेसबुकच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. तुमची छोटीशी चूक, आणि तुमची वैयक्तिक माहिती ही चुकीच्या लोकांच्या हाती लागलीच म्हणून समजा. मात्र नेमके आपल्यावर कोण हेरगिरी करते आहे याची माहिती मिळवणे अतिशय जिकरीचे काम असते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी एक खास पद्धत ज्याच्या माध्यमातून तुम्हीदेखील माहिती करू शकाल की कोण तुमच्यावर हेरगिरी करते आहे.
कोण करतोय हेरगिरी?
ऑफिस किंवा इतर ठिकाणी तुम्ही फेसबुकवर लॉगइन करत असाल तर कुणीही तुमच्या एकाउंटची हेरगिरी करण्याची शक्यता आहे. मात्र ही व्यक्ती कोण ते माहिती करणे सुधा शक्य आहे. सर्वप्रथम फेसबुक वर उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन टिंबावर क्लिक करा यानंतर सेटिंग ऑप्शन मध्ये जा. आता तुम्हाला Security and Login असे एक ऑप्शन दिसे. यावर क्लिक केल्यानंतर Where you are logged In चे ऑप्शन दिसेल. यात आपण बघू शकाल कr तुमचे फेसबुक कोणकोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी एक्सेस करण्यात आहे आहे. या माहितीवरून तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणी तुमचे एकाउंट एक्सेस केले आहे किंवा नाही याचा अंदाज लावणे देखील शक्य होईल.
अकाउंट ची हेरगिरी अशी थांबवा
वरील प्रकारे आपले फेसबुक कुठे कुठे सुरु आहे हे आपल्याला दिसल्या नंतर ज्या ज्या डिव्हाईजवर आपल्याला शंका आहे त्या त्या डिव्हाइस वरून त्त्वरीत लॉग आउट करा. याशिवाय ज्या लॉग रेकोर्ड वर तुम्हाला शंका असेल त्या ठिकाणी रेव्ह्यू लॉग इनचे ऑप्शन सुद्धा दिसेल या ठिकाणी रिव्ह्यू करून तुम्ही लॉग आउट करू शकता.