विशेष प्रतिनिधी, मुंबई
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने आज मोठा उत्साह सर्वत्र दिसत आहे. अशा खास प्रसंगी, काही तरूण मुले -मुली आपल्या वडिलांना खास भेटवस्तू देतात. या भेटवस्तू केवळ संस्मरणीय नसतात, तर आपल्या वडिलांची गरज पूर्ण करू शकतात. ग्रामीण भागातील बहुतेक पालक अद्यापही कीपॅडसह फीचर फोनचा वापर करत आहेत. याचे कारण म्हणजे पालकांना कीपॅडसह फीचर फोन ऑपरेट करणे सोपे वाटते. पालकांची ही गरज लक्षात घेऊन फादर्स डेसाठी विविध कंपनीचे टॉप ५ फीचर फोन आले असून ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे.
नोकिया 105 एसएस
नोकिया 105 एसएस स्मार्टफोनची किंमत 1229 रुपये आहे. नोकिया 105 मध्ये 1.77-इंचाची स्क्रीन आणि 4MB रॅम आहे. या फोनमध्ये मायक्रो यूएसबी पोर्ट आणि 800 एमएएच बॅटरी आहे. या फोनमध्ये एफएम आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देखील आहे.
आयटेल मॅझिक 2
आयटेल मॅझिक 2 या 4G फोनची किंमत 2,349 रुपये आहे. फोन एचडी कॉल गुणवत्तासह येतो. यात वाय-फायसह ड्युअल सिम स्लॉट आहे. फोन 100 दिवसांच्या बदलीची वारंटीसह येईल. तसेच एक वेळ स्क्रीन बदलण्याची सुविधा उपलब्ध असेल. यात 1.3 एमपी चा मागील कॅमेरा असेल जो फ्लॅश सपोर्टसह येईल. या फोनमध्ये 128 एमबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आला आहे.










