रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१३० पेक्षा अधिक पुरस्कार मिळवलेला फास चित्रपट ४ फेब्रुवारीला सिनेमागृहात; शेतकरी व त्यांच्या जीवनावर आधारित कथानक

by Gautam Sancheti
जानेवारी 27, 2022 | 3:03 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220127 WA0015

नाशिक – शेतकरी व त्यांच्या जीवनावर आधारित फास हा चित्रपट ४ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अविनाश कोलते यांनी दिग्दर्शीत केलेला हा चित्रपट असून त्यात दिग्दर्शनाखाली तयार झालेला आशयघन ‘फास’ ४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘फास’ या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील सिनेमहोत्सवांमध्ये या चित्रपटावर कौतुकासोबतच पुरस्कारांचाही वर्षाव झाला आहे. सिनेमहोत्सवांमध्ये येणाऱ्या जाणकार प्रेक्षकांच्या जोडीलाच समीक्षकांनीही ‘फास’ची पाठ थोपटली आहे. आजतागायत या चित्रपटानं १३० पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. कसदार कलावंतांचा दमदार अभिनय हे ‘फास’चं आणखी एक वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय पारितोषिकावर आपलं नाव कोरणारा उपेंद्र लिमये हा आघाडीच्या अभिनेत्यानं या चित्रपटासाठी पोलिसी युनिफॅार्म चढवला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या भावभावनांसोबतच त्यांच्या अडचणींचा आलेखही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कमलेश सावंतनं शेतकऱ्याच्या मुख्य भूमिकेत लक्षवेधी अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. सयाजी शिंदेंसारख्या मातीतील कलाकारानं साकारलेला डॅाक्टरही पाहण्याजोगा आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘फास’ हा चित्रपट प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील फास नेमका कोणाचा आहे, या चित्रपटात कशा प्रकारची कथा पहायला मिळणार आहे, हा शेतकऱ्यांनी घेतलेला फास आहे की अन्य कोणी… या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये मिळणार आहेत. माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ची सहनिर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी केली आहे. वरवर पाहता हा चित्रपट केवळ शेतकरी आणि त्यांच्या व्यथा मांडणारा असेल असं वाटणं स्वाभाविक आहे, पण लेखिका माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून समाजातील विविध घटकांच्या गळ्याशी आवळला गेलेला ‘फास’ या चित्रपटात आपल्या लेखनाद्वारे मांडला आहे. अविनाश कोलते यांनी तो तितक्याच संवेदनशीलतेनं पडद्यावर सादर केला आहे.

पोलिस, डॅाक्टर, सरकारी कर्मचारी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेतच. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या फासाची भीती आहे. कोलते यांनी ‘फास’चं कथानक पडद्यावर सादर करताना यांसारख्या विविध पैलूंना स्पर्श करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शेतकरी का फास लावून घेतो, त्याची कारणं काय, तो इतका हतबल का होतो, त्याच्या पश्चात कुटुंबियांचं काय होतं, त्याच्या मुलांच्या डोळ्यांत कधी स्वप्नं तरळतच नाहीत का, वडीलांनी गळफास घेतल्यावर मन:स्थितीचा कोणी विचार करतो का… अशा सर्व प्रश्नांची उत्तरं ‘फास’ चित्रपटात कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता परीपूर्ण मनोरंजनाच्या माध्यमातून मिळणार आहेत. फास केवळ जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या गळयाभोवती नसतो, तर शहरातील लोकांच्याही गळ्याभोवती असतोच. याचसाठीच हा चित्रपट ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या जोडीला मेट्रो सिटीमधील नागरिकांनीही अवश्य पाहण्याजोगा आहे.

या चित्रपटात पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या सर्वच कलाकारांनी सुरेख अभिनय करत मुख्य कलाकांना मोलाची साथ दिली आहे. सिनेमॅटोग्राफर रमणी रंजन दास यांची अफलातून सिनेमॅटोग्राफी आणि अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी केलेलं अचूक संकलन या ‘फास’च्या गोष्टीही उजव्या ठराव्या अशाच आहेत. संतोष समुद्रे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. ‘फास’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सजलेला एक आशयघन चित्रपट रसिकांच्या सेवेत हजर झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डांगसौंदाणे विद्युत उपकेंद्रातील प्रशिक्षणार्थी कर्मचारीचा विजेच्या धक्याने मृत्यू; ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Next Post

आमदार नितेश राणेंना सुप्रिम कोर्टाचा दणका; शरण येण्याचे आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Next Post
nitesh rane

आमदार नितेश राणेंना सुप्रिम कोर्टाचा दणका; शरण येण्याचे आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011