नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा विक्रीसाठी बाजार समितीत घेवून जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला – पीक अप वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव – नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ मध्यरात्री घडली. एकनाथ सोनवणे असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मयत एकनाथ सोनवणे हे हिंगणे – देहेरे येथून नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेवून जात होते. जळगाव खुर्द येथे चाळीसगाव कडून येणाऱ्या मालवाहू पिकअपने पाठीमागून जोरदार धडक दिली यात शेतकरी सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला.
कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात. कांदा विकून दोन पैसे मिळावे यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू असते. या धडपडीतच शेतक-याचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641026728700301312?s=20