सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शेतक-यांनी भाव न मिळाल्याने रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. टोमॅटोच्या कॅरेटला ७० ते १०० रुपयाचा भाव मिळत आहे. त्यामुळे काढणीचा, वाहतुकीचा खर्च मिळू शकत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. याच संतप्त शेतक-यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिला. रात्री एका शेतक-यांनी फेकलेल्या या सर्व टोमॅटोचा व्हि़डिओ तयार करुन तो व्हायरल केल्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.