नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाने काही दिवसांची उघ़डीप दिल्यानंतर शेतक-यांनी बाजरी कापणी करुन ती सुकविण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. पावसामुळे अगोदरच बाजरी कापणीला उशीर झालेला होता. मात्र काही दिवसांपासून चांगले कडक ऊन पडत असल्याने आणि पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतक-यांची कणस सुकवण्याच्या कामाची तयारी सुरु असल्याच सध्या पहावयास मिळत आहे. अगोदरच पावसामुळे बाजरीला फटका बसून उत्पादन कमी येणार आहे. त्यामुळे पुन्हा पावसामुळे पीक खराब होऊ नये याची लगबग सुरु आहे.