सोमवार, सप्टेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेताय? आधी हे वाचा… नक्की नियम काय आहेत? तुमचे अधिकार काय आहेत?

by Gautam Sancheti
जानेवारी 27, 2023 | 1:47 pm
in इतर
0
farmer

इंडिया दर्पण विशेष लेखमाला 
– जागो ग्राहक जागो –
कृषी कर्ज आणि शेतकरी

बँकेत कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकरी ग्राहक राजाला अनेकदा बहुतांश बाबी माहित नसतात. त्यामुळे त्याची फसवणूक होते आणि खासकरुन तो मानसिकरित्याही खुपच खचतो. अनेकदा तर या संकटामुळे तो आत्महत्याही करतो. पण, आज आपण कृषी कर्जाबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

IMG 20220513 WA0011
विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत पीक कर्जासाठी जेव्हा अर्ज दिला जातो तेव्हा काही बँक मॅनेजर हे ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालतात. शेतकरी ग्राहकास हा जाणकार नसल्यामुळे गुपचूप बँकेतून परत घरी येतो. बँक कर्ज देत नाही म्हणून एखाद्या गावातील, तालुक्यातील सावकाराकडून भरमसाठ व्याजाने कर्ज काढतो आणि त्याचे व्याजावर व्याज भरून मेटाकुटीला येतो आणि नंतर निसर्गाने पण धोका दिला की आत्महत्या करत बसतो.

शेतकरी राजा अजिबात आत्महत्या करू नकोस. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सांगितले आहे की आपण शेतकरी वर्गास कर्ज देताना सिबिल स्कोर, सिबील रिपोर्ट मागायची गरज नाही. सर्व बँकांचा कारभार हा रिझर्व्ह बँकेच्या देखरेखी खाली चालतो आणि रिझर्व्ह बँकेने अखून दिलेल्या रचने प्रमाणे चालतो. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात शेतकरी वर्गास कर्ज देताना सीबिल संबंधीचे कोणतेही निर्बंध दिलेले नाहीत. शिवाय महाराष्ट्र राज्यातील सहकार आयुक्त यांनी असे परिपत्रक काढले आहे की राष्ट्रीयीकृत बँकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे. सदर परिपत्रकचा अनुक्रमांक
जा. क्र. कृषीपत-०४/पीक कर्ज/सिविल /२०२२ दिनांक : ३० डिसेंबर, २०२२ आहे. सहकार आयुक्त यांनी बँक ऑफ समन्वयक असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीस तसे पत्र पठवले आहे.

विविध पिकांच्या उत्पादनासाठी तथा पिकाच्या जोपासणीसाठी शेतकऱ्यांना भांडवलाची तथा कर्जाची गरज असते. या भांडवली गुंतवणुकीतून शेतकरी शेती उत्पादन करीत असतात आणि यामधुन रोजगार तसेच चरितार्थाचे साधन उपलब्ध होते. त्यामुळे शेतकन्यांना भांडवल उपलब्धीसाठी बँकांवर अवलंबुन रहावे लागते. बऱ्याच सहकारी बँक हया कमकुवत अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकरी वर्गास राष्ट्रीयकृत बँक तसेच व्यापारी बँकेने पीक कर्ज पुरवठा करावा असे त्यात नमूद केले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडील प्राधान्यक्रम क्षेत्रास कर्जपुरवठा करण्याबाबतच्या ( Priority Sector Lending) सुचना केल्या आहेत आणि बँकांनी एकूण कर्जपुरवठयाच्या भारतीय रिझव्ह बँकेने विहित केलेल्या प्रमाणात अल्पमुदती पीक कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करणे बंधनकारक आहे.

सर्व राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक यांना सरकार बँकिंग चे लायसेन्स देते त्यात कर्ज पुरवठा कशा पद्धतीने करायचा, ठेवी कशा घ्यायच्या आणि व्याजदरचे बाबत धोरण सरकार रिझर्व्ह बँक मार्फत ठरवते. त्यात शेतकरी वर्गास कर्ज पुरवठा करते तेव्हा सदर कर्जाबाबत सरकार रिझर्व्ह बँकेस काही निर्देश देत असते. शिवाय जेव्हा कर्ज माफी केली जाते तेव्हा सदर कर्ज हे बँक स्वतः भरते. परंतु काही सहकारी बँकांनी अपहार करून सदर शेतकरी वर्गास वाऱ्यावर सोडलेले असते. तेव्हा सरकारचे निर्देशानुसारच रिझर्व्ह बँक ने इतर बँकांना निर्देश दिले आहेत.

तेव्हा शेतकरी राजा तू खासगी सावकारांकडून कर्ज घेऊ नकोस तर राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक यांच्याकडून कर्जे घे आणि बँकेने जर सीबील स्कोअर हा ६००_७०० नाही म्हणून कर्जे देणे नाकारत असेल तर त्यांची तक्रार ही सहकार आयुक्त, मुख्य सचिव सहकार, महाराष्ट्र राज्य आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना करा. सदर सरकारी ऑफिस आणि रिझर्व्ह बँकेचे पत्ते आपल्या माहिती साठी सोबत देत आहे.

१) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, सेंट्रल बिल्डिंग, पुणे ४११००१.
२. मा. मुख्य सचिव (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
३. मा. मुख्य महाप्रबंधक, भारतीय रिझव्ह बँक, डिपार्टमेंट ऑफ सुपरव्होजन. ३ रा मजला, भायखळा ऑफीस इमारत, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासमोर, मुंबई-४००००८
शेतकरी राजा तरीही काही अडचण आलीच तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे संपर्क करा आणि मोफत मार्गदर्शन घ्या.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153

,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089 श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार*श्रीम.वदंना तोरवणे,मो .9156972786

Farmers Crop Loan Rules Cheating Consumer Rights Bank by Vijay Sagar
Jago Grahak Jago

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिवसेना ठाकरे गटात प्रवेशासाठी डॉ.अद्वय हिरे कार्यकत्यांसह मुंबईकडे निघाले

Next Post

संतापजनक! कारमध्ये कोंबून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; वर्गमित्रच निघाला नराधम, विदर्भ हादरला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Sushma Andhare
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 31, 2025
ycmou gate 6
स्थानिक बातम्या

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 31, 2025
Untitled 50
मुख्य बातमी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा…झाले हे निर्णय

ऑगस्ट 31, 2025
WhatsApp Image 2025 08 31 at 1.51.19 PM 1024x683 1
संमिश्र वार्ता

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शन

ऑगस्ट 31, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

ऑगस्ट 31, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! कारमध्ये कोंबून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; वर्गमित्रच निघाला नराधम, विदर्भ हादरला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011