गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शेतकऱ्यांनो, बाजार समितीत तुमची अशी होतेय सर्रास फसवणूक; येथे तातडीने करा तक्रार…. घ्या जाणून सविस्तर…

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 10, 2023 | 1:11 pm
in इतर
0
apmc bajar samiti

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक नक्की कशी होते?

शेतकरी हे अतिशय काबाडकष्ट करुन त्यांचा शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत असतात. मात्र, याठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणात सर्रास फसवणूक होत असते. त्याची फारशी माहिती शेतकऱ्यांना नसते. ही फसगत कशी असते, ती झाली तर काय करायचे याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ…

IMG 20220513 WA0011
विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

शेतकरी आणि शहरी ग्राहक, वजन काटा कॅलिब्रेट असतो का?
शेतकरी राजा कारखान्याला ऊस देत असताना वजन करून देतोस ना?
एपीएमसी बाजारात कापूस विकताना वजन करून देतोस ना?
एपीएमसी बाजारात शेतमाल विकताना वजन करून देतोस ना?
शहरी ग्राहक सोने-चांदी, धान्य आणि इतर सामान वजन करून घेतोस ना?
तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का .. हो आम्ही सर्व वजन करूनच देतो आणि घेतो.

ग्राहक मित्रांनो, आपण ज्या काट्यावर वजन करतो तो काटा हा योग्य वजन देतो आहे की त्यात काही गडबड आहे हे पाहता का?.
सर्वच साखर कारखाने हे ऊस घेत असताना ट्रॅक्टर, ट्रक यांचे वजन करून घेतात पण आपण सजग आहात का?
सदर वजन काटा योग्य रीतीने वजन दाखवत आहे की त्यात आपण लुटले जात आहोत.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतने साखर कारखान्यातील काट्या बाबत वजन माप विभागात तक्रार केली असता वजन माप अधिकारी (अताचे लीगल मेट्रोलोजी डिपार्टमेंट) यांनी आचानक अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रतिनिधी सोबत असे कारखाने तपासले असता त्यात प्रचंड प्रमाणात तफावत अढळली. काही कारखान्यात ३०० किलो पर्यंत तफावत अढळली होती. विचार करा १२ टन ऊस गाडी मागे जर ३०० किलो फरक पडत असेल तर शेतकरी किती लुटला जातो. आधी वजनात मारायचे नंतर उताऱ्यात मारायचे.

यावर उपाय काय?
प्रत्येक शेतकरी वर्गाने स्वतः बाहेर वजन करून घेऊन आपल्या मोबाईल ने त्याचे शूटिंग करावे आणि वजन पावती जपून ठेवावी.
कारखान्यातील वजन काट्यावर वजन होते त्याचे पण मोबाईल द्वारे शूटिंग करावे आणि त्याची वजन पावती पण जपून ठेवा.
फरक असेल तर सरळ तक्रार करा….
कुठे आणि कशी तक्रार करायची ते लेखाचे शेवटी दिले आहे
दुसरे असे की शेतकरी वर्ग हा कापूस/कांदा विकण्यासाठी APMC मध्ये जातो तेव्हा त्याचे वजन केले जाते ते बरोबर आहे का हे तपासले पाहिजे.
दुसरे म्हणजे जेव्हा आपला शेतमाल बाजारात घेऊन जातो तेव्हा त्याने दलालास, व्यापाऱ्यास जो माल देतो तेव्हा त्याचे वजन बरोबर आहे का हे तपासले पाहिजे.
आपण लुटले तर गेलो नाही ना? याची खात्री करून घेतली पाहिजे.

शहरी ग्राहक किंवा ग्रामीण ग्राहक जे काही खरेदी करतात त्या वेळी वजन करून घेतात पण सदर वजन बरोबर आहे की नाही याची खात्री एकदाही ग्राहक करून घेत नाही.
आपण खरोखरच सजग ग्राहक आहोत की नाही? आपण आपले डोळे उघडे ठेऊन आणि आपली सद सद विवेक बुध्दी वापरून खरेदी करतो आहोत का हे पाहतच नाही.
विचार करा सोने विकत घेताना आपण जर काही मिलीग्राम सोने आजच्या दराने कमी आले तर किती फसले जाताल. (१ ग्राम म्हणजे १०० मिलिग्रॅम)
कोणतेही वजन वापरताना ते प्रमाणित (कॉलीबरेटेड) असलेच पाहिजे आणि प्रमाणीकरण सर्टिफिकेट हे ज्या कालावधी साठी दिले आहे त्या कालावधीतच वापरले पाहिजे.*

वजन काटा, स्केल हे प्रमाणित आहे का याची तपासणी ग्राहक म्हणून आपण केली पाहिजे.
कॅलीबरेशन सर्टिफिकेट हे नूतनीकरण केलेले आहे का हेही तपासले पाहिजे. ग्राहक म्हणून आपला तो हक्क आहे.
वजन काटा हा साधा असू द्यात किंवा इलेक्ट्रॉनिक कोणताही काटा हा प्रमाणितच असला पाहिजे.*
कित्येक लोकांचा गोड गैरसमज असतो की इलेक्ट्रॉनिक काटा म्हणजे एकदम बरोबर वजन देतो त्यात फेर फार करता येत नाही.
पण ग्राहक मित्रानो आपण जर स्वतः यूट्यूब वर पाहिले तर कित्येक प्रकारे त्यात फेरफार करून आपल्याला फसवले जात आहे.
स्टीलचे वजनकाटे, बुलियन वजन काटा, काउंटर वरील मशीन, बीम स्केल हे दोन वर्ष पर्यंत प्रमाणित असतात. तर इलेक्ट्रॉनिक वजन काटे, प्लॅटफॉर्म वजन काटे हे एक वर्ष पर्यंत प्रमाणित असतात.

२००९ चे लीगल मेट्रोलॉजी कायदा आणि त्याचे लीगल मेट्रोलॉजी रुल्स 2011 नुसार सदर सर्व वजने ही शिक्के(सिल) मारलेली म्हणजेच वजन माप इन्स्पेक्टर ने प्रमाणित केलेली असावीत.
शिवाय त्याचे प्रमाणपत्र हे दर्शनी भागात जिथे वजन काटा ठेवला आहे तिथे लावलेच पाहिजे.
ग्राहकाने सदर सर्टिफिकेट जिथे वजन काटा ठेवला आहे तिथे नसेल तर दुकानदार किंवा अडते यांना जाब विचारला पाहिजे आणि त्याबाबत लेखी तक्रार वजन माप अधिकारी, लीगल मेट्रोलॉजी विभागाकडे केली पाहिजे.
डिजिटल वजन काट्यावर एक प्लेट फिक्स केलेली असावी त्यात वजन काट्याचा क्लास, क्षमता इत्यादी माहिती असावी.

सराफ मंडळींनी कमीत कमी क्लास वर्ग दोन चे वजन काटे वापरले पाहिजेत.
डिजिटल काटे हे सिल केलेले असावेत जेणेकरून त्यात फेरफार करता येऊ नये.
सर्व काटे हे लीगल मेट्रोलॉजी चे इन्स्पेक्टर ने चेक केलेले, सिल आणि प्रमाणित केलेले असावेत.
तेव्हा सर्व शेतकरी आणि सर्व प्रकारचे ग्राहक मंडळी आपण जागृत व्हा आणि जर कुठे आपणास शंका आली तर आपण सरळ लेखी तक्रार नोंदवा.

तक्रार नोंदवणे साठी पत्ता:-
कंट्रोलर, लीगल मेट्रोलॉजी विभाग, महाराष्ट्र राज्य, ७ वा मजला, एम टी एन एल फाऊंटन टेलिकॉम बिल्डिंग नंबर १, हुतात्मा स्मारक चौक, एम जी रोड, मुंबई ४००००१.
फोन ०२२-२२६२१९७८ ईमेल: clmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com
तसेच नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांना पण आपण ईमेल करू शकता.
Sec.fcs@maharashtra.gov.in
फॅक्स ०२२-२२८४५११६
या शिवाय आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी देखील संपर्क साधून आपल्याला शंका येत असलेल्या कारखाना, दुकानदार, अडते, बाजार समिती यांची माहिती देऊ शकता.

लक्षात ठेवा.:
जर वजन मापात फरक केला हे सिद्ध झाले तर असे करणाऱ्याला रुपये ५०००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो शिवाय परत परत तेच करत असेल तर सहा महिन्या पेक्षा जास्त एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
तेव्हा सर्व नागरिकांनी जागृत व्हावे आणि आपले हक्क समजून घ्यावेत आणि आपण फसू नये म्हणून काळजी घ्यावी.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675

*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243

*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक*श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार*श्रीम.वदंना तोरवणे,मो .9156972786

Farmers APMC Cheating How Complaint by Vijay sagar
Consumer Calibration

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदीही झाले दिंडोरीच्या लहरी बाईचे चाहते; कोण आहे ही महिला? असं काय केलं तिने? (व्हिडिओ)

Next Post

उत्तर प्रदेशमध्ये ७५ हजार कोटींची गुंतवणूक…. १ लाख नवे रोजगार… मुकेश अंबानींची घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
Next Post
IMG 20230210 WA0009

उत्तर प्रदेशमध्ये ७५ हजार कोटींची गुंतवणूक.... १ लाख नवे रोजगार... मुकेश अंबानींची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011