इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे 40 वर्षांपूर्वी शाळेत असताना एक अशी कथा होती की, त्यामध्ये एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याला धनाचा हंडा सापडतो, असा उल्लेख होता. परंतु शेत नांगरत असताना धनाच्या हंडे ऐवजी नोटांचे घबाडच सापडले तर ? होय बिहारमध्ये खरोखर अशी घटना घडली परंतु पुढे काय झाले? सिगोडी पासोधा गावानजिकच्या बधर येथील एका शेतात नोटाबंदीच्या ५०० आणि १००० रुपयांच्या लाखो नोटा सापडल्या आहेत. याची माहिती गावात झपाट्याने पसरताच ग्रामस्थांनी धावत शेत गाठले. नोटा उचलण्याची शर्यत लागली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच ते तात्काळ पोहोचले. मात्र तोपर्यंत ग्रामस्थ सर्व नोटा घेऊन पळून गेले होते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पळसौदा गावातील बधर येथे गावातील शेतकरी अजय सिंग यांचे आहे. त्यांच्या शेतात नांगरणी सुरू होती. त्याचवेळी प्लॅस्टिकच्या गोणीत 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा सापडल्या. ट्रॅक्टरने नांगरणी केली. यादरम्यान नांगरात अडकल्याने पैशांनी भरलेली पोती फुटली. त्यामुळे 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा शेतात पसरल्या होत्या.
ट्रॅक्टर चालकाने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. शेतात पैसे मिळाल्याची खबर मिळताच गावकऱ्यांची गर्दी शेताकडे धावली. शेतात विखुरलेले पैसे पाहून नागरिकांमध्ये पैसे गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. अचानक सर्व नोटा गायब झाल्या. फक्त एक फाटलेली जुनी पोती उरली होती. पोलीस शेतात पोहोचेपर्यंत त्यांनी जमेल तेवढी रक्कम लुटली. गोणीत भरलेले पैसे कोट्यवधीत असायचे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
शेतात जुन्या नोटा कोठून आल्या आणि त्या कोणाच्या आहेत हे शोधण्याचाही प्रयत्न पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांकडून ग्रामस्थांच्या छापा टाकून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यात येत आहे. मात्र, या सर्व चलानातून बाद झालेल्या 500 आणि हजारच्या जुन्या नोटा आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा कोणी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. याचा शोध पोलीस घेत आहेत.