नाशिक – महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात काही बदल करण्यात आले असून त्यासंबंधीचं परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जारी केलं आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतजमिनीची खरेदी किंवा विक्री करणार असाल तर तुम्हाला हे बदल माहिती असणं आवश्यक आहेत. यासंदर्भातील एक मेसेज सध्या सोशल मिडियामध्ये व्हायरल झाला आहे. मात्र, हा संदेश पूर्णपणे खरा नाही. त्यामुळेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जारी केलेले पत्रक उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी मूळ परिपत्रक उपलब्ध करुन दिले आहे. हे परिपत्रक खालीलप्रमाणे