मुंबई – शेअर बाजार हा एक प्रकारे सट्टा किंवा नशीबाचा खेळ म्हटला जातो. त्यामध्ये कधी खूप धनलाभ होतो तर कधी कफल्लक देखील होण्याची वेळ येऊ शकते. तरीही अनेक जण या मध्ये पैसे लावून आपले भाग्य आजमावतात.
या संदर्भात अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट शेअर बाजाराबद्दल म्हणतात, “जेव्हा इतर व्यक्ती यात लालूच दाखवतात तेव्हा घाबरा आणि जेव्हा इतर घाबरतात तेव्हा तेथे लोभ दाखवा. ” शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
बहुतांश वेळा पेनी स्टॉक (मूल्यानुसार स्वस्त स्टॉक) खूप कमी कालावधीत मजबूत परतावा देऊ शकतात, जर योग्य वेळी पैसे गुंतवले काही वेळा फायदा होऊ शकतो. सध्या असाच एक पेनी स्टॉक म्हणजे गीता रिन्युएबल एनर्जीचा आहे. या शेअर मुळे केवळ 1 वर्षात गुंतवणूकदारांनी 53 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर गीता रिन्युएबल एनर्जीचे शेअर्स 5.79 रुपयांच्या पातळीवर होते. दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईमध्ये 312.75 रुपयांवर बंद झाले. गीता रिन्युएबल एनर्जीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 5,300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
एखाद्या व्यक्तीने गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आजच्या तारखेनुसार त्याचे मूल्यांकन 54 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. म्हणजेच गुंतवणूकदाराला 53 लाख रुपयांचा थेट फायदा झाला असता. कंपनीने या वर्षी आतापर्यंत 4300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. लक्षात ठेवा की, पेनी स्टॉकमध्ये जास्त जोखीम असते, त्यामुळे सखोल संशोधन केल्यानंतर, जोखीम समजून घ्या आणि या स्टॉकमध्ये पैसे गुंतवा. या कंपन्यांच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची खात्री करा. गीता रिन्युएबल एनर्जीच्या जून तिमाहीच्या निकालांवर नजर टाकली तर, कंपनीचा महसूल 0.6 कोटी रुपये आहे आणि कंपनीचा नफा 3.62 कोटी रुपये आहे.