इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड कलाकारांना भेटणे, त्यांच्यासोबत सेल्फी घेणे, त्यांच्याशी बोलणे यासाठी चाहते आग्रही असतात. खासकरुन विमानतळावर सेलिब्रेटी भेटले की चाहत्यांना प्रचंड आनंद होतो. किंवा तेथे हमखास भेटतात. अन्य ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष भेटणे किंवा त्यांच्या जवळ जाणे शक्य नसते. मात्र, विमानतळावर सेलिब्रिटींना केवळ पापाराझीच नव्हे तर चाहत्यांचाही सामना करावा लागतो. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्ससोबत सेल्फी घेण्यासाठी वाट पाहत असतात. पण आवश्यक नाही की हा चाहत्यांचा क्षण सेलिब्रिटींसाठी आनंदाचा असेल. अभिनेत्री करीना कपूर अशाच एका फॅन ग्रुपच्या गैरवर्तनाची शिकार झाली.
करीना कपूर ही मुलगा जहांगीर आणि आजीसोबत मुंबई विमानतळावर रविवारी रात्री उशिरा दिसली. करीना विमानतळाच्या एंट्री गेटकडे जात असताना एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी तिला घेरले. त्यानंतर या फॅन ग्रुपमधील एक व्यक्ती आला आणि तो करीनाकडे गेला. हात पसरून तिला पकडू लागला. अचानक आपल्यासोबत असे घडल्याने करीना घाबरली होती, मात्र त्यानंतर सुरक्षा पथकाने त्या व्यक्तीला करिनापासून दूर नेले. हे सर्व पाहून करीना अस्वस्थ दिसत होती. हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते. पण कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देता ती तिथून निघून गेली.
करीनाशी चाहत्यांनी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते अभिनेत्रीसोबतच्या अशा वागण्यावर संतापले आहेत. तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिले, की हे अजिबात योग्य नाही, कसे वागावे हे चाहत्यांना कळले पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, हे खूप वाईट आहे, चाहत्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. दुसर्या एका चाहत्याने लिहिले, लोक वेडे झाले आहेत, त्यांनी किमान सभ्यपणे वागले पाहिजे, ती पूर्णपणे घाबरली होती. लोकांनी थोडेसे संवेदनशील असले पाहिजे, ते देखील मानव आहेत.
करीना तिच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर दिसणार आहे. एकता कपूर तिच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. करिनाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. तिने इंस्टाग्रामवर हंसल मेहता आणि एकता कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्याला ‘नवीन सुरुवात’ असे कॅप्शन दिले होते.
बघा हा व्हिडिओ
Fan Misbehavior Actress Kareena Kapoor Video
Entertainment Bollywood