पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ञ डॉ नरेंद्र वैद्य यांची आज, दुपारी दीड वाजता मुलाखत प्रसारीत होणार आहे. एबीपी माझा या मराठी वृत्त वाहिनीवर ते लाईव्ह मार्गदर्शन करणार आहेत. संधिवात, गुडघेदुखीवरील लेसर व रोबोटिक उपचार या विषयावर ते अनेक शंकांचे निरसन करणार आहेत.
डॉ. नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ४५,००० हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया १२००० रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि १,५०,००० हून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणून त्यांनी १२००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
Famous Doctor Narendra Vaidya Interview Today