इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडच्या फेममधून बाहेर पडलात की, तिथे फेम कमी होतो आणि सगळंच खूप कठीण होत जात. मग येतात त्या आर्थिक प्रश्नांसह अनेक अडचणी. त्यामुळे या विश्वातून बाहेर पडल्यानंतर अनेक कलाकारांचे आयुष्य कठीण झाल्याचं दिसतं. आताही सुमारे ३०० चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. तिच्यावर उपचार करायलाही तिच्याकडे पैसे नाहीत अशी तिची अवस्था असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
जयाकुमारी या १९६० आणि १९७० च्या दशकात तमिळ आणि मल्याळम सिनेमांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ग्लॅमरस भूमिकांसाठी त्या ओळखल्या जायच्या. सध्या त्या किडनीशी संबंधित आजाराने ग्रासल्या असून उपचारासाठी त्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. जयाकुमारी यांना चैन्नईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयामधील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्या मुलगा रोशनसोबत राहत आहेत. जयाकुमारी यांच्या पतीचे नाव नागापट्टिनम अब्दुल्ला होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जयाकुमारी सध्या त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत, कारण उपचारांसाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो आणि ती इतकी रक्कम देण्याच्या त्या स्थितीत नाहीत. त्यांना आशा आहे की, सिनेसृष्टीतील लोक त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येतील. यापूर्वी कठीण काळात असलेल्या सहकलाकारांना चिरंजीवी आणि रजनीकांत यांनी मदत केली होती. अभिनेत्रीने १९६८ मध्ये ‘कलेक्टर मालथी’ या मल्याळम सिनेमातून पदार्पण केलं होतं.
त्यांनी ‘फुटबॉल चॅम्पियन’मध्ये प्रेम नझीर, ‘नूत्रक्कू नूरू’मध्ये जयशंकर आणि ‘मन्निना मागा’मध्ये डॉ राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘एन्गिरिंदो वेदल’, ‘हरमाना’, ‘नटरुक्कू नुरू’, ‘अनाथाई आनंदन’ आणि इतर अनेक चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली.
Famous Actress Jayakumari Life Struggle Medical Treatment Money
Entertainment South Film
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD