नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाने दिवाळीपूर्वी कौटुंबिक निवृत्तीवेतनाबद्दल मोठी घोषणा केली आहे. सैनिकांच्या मुलांना देण्यात येणारी कौटुंबिक निवृत्तीवेतनाची कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्यांचे आई-वडील दोघेही संरक्षण मंत्रालयात कर्मचारी आहेत, त्यांना या बदलाचा लाभ मिळणार आहे. संबंधित आई-वडील सातव्या केंद्रीय वेयतन आयोगाच्या कक्षेत असणेही आवश्यक आहेत. त्याशिवाय नॉमिनीमध्ये मुलांचे नाव असणे आवश्यक आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
निवृत्तीवेतन किती?
सरकारी सेवांमध्ये जास्तीत जास्त निवृत्तीवेतन भरपाईमध्ये संशोधन करून २.५ लाख रुपये प्रतिमहिना करण्यात आला आहे. आई-वडील, दोघांच्या संबंधित एक मुलगा किंवा मुलांना देय कौटुंबिक निवृत्तीवेतनाची कमाल मर्यादेत संशोधन करण्यात आले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, पूर्वी जी पाल्ये या कक्षेत असतील त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा आदेश लागू करण्यात आला आहे.
सध्या सरकारी कर्मचार्याचा मुलगा या अटी पूर्ण करत असेल तर तो दोन कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळवण्यास पात्र असेल. दोन्ही कौटुंबिक निवृत्तीवेतनाची कमाल रक्कम १,२५,००० रुपये प्रतिमहिना आहे. जर दोन्ही निवृत्तीवेतन सामान्य दरांमध्ये देय असेल तर ७५००० रुपये प्रतिमहिना निवृत्तीवेतन दिले जाऊ शकते. नव्या बदलानंतर संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना कौटुंबिक निवृत्तीवेतनाची मोठी रक्कम मिळणार आहे.